शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:25 IST

प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली यांनी ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे. सुगंधीत तंबाखू, गुटखा, पान मसाला यांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आहे.

ठळक मुद्दे९० दिवसांसाठी : अन्न, औषध प्रशासन विभागाचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली यांनी ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे.सुगंधीत तंबाखू, गुटखा, पान मसाला यांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आहे. तरीही छत्तीसगड राज्यातून सुगंधीत तंबाखू, चारचाकी वाहनांद्वारे आणला जातो व त्याची विक्री गडचिरोली जिल्ह्यातील दुकानांमध्ये केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करून सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारे एमएच ३३ पीए ९७८९, एमएच १२ जेसी ६३३८, एमएच ३३ वाय ३०८३, एमएच ३३ एच ४४६१ या चार वाहनांचा परवाना निलंबित करावा, असा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सं. कृ. कांबळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या वाहनांचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारा वाहन पकडल्यानंतर सदर वाहन सोडून दिला जात होता.त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वाहनाने सुगंधीत तंबाखूची वाहतूक केली जात होती. सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही जुमानत नव्हते. मात्र आता या वाहनांचा परवाना निलंबित करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबल्याने सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.