शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

सर्वेक्षणातच रखडल्या उपसा सिंचन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:51 IST

मोठ्या नद्यांची देण असतानाही सिंचन सुविधांअभावी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिकांपासून वंचित राहावे लागत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रस्तावित असलेल्या सिंचनाच्या योजनाही रखडल्या आहेत.

ठळक मुद्देसिरोंचा तालुका तहानलेला : चार योजनांसह तुमडीहेटी प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची देण असतानाही सिंचन सुविधांअभावी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिकांपासून वंचित राहावे लागत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रस्तावित असलेल्या सिंचनाच्या योजनाही रखडल्या आहेत. तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या तालुक्यासाठी कालेश्वरम प्रकल्पाच्या वरील बाजुने (बॅकवॉटरवर) असलेल्या चार योजनांच्या कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही.टेकडा, पेंटीपाका आणि रंगयापल्ली अशा तीन उपसा सिंचन योजनांमधून सिरोंचा तालुक्यातील ५०६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. याशिवाय रेगुंठा उपसा सिंचन योजनेतून या तालुक्यातील २०५२ हेक्टर शेतजमिनीला तर तुमडीहेटी प्रकल्पातून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या २५ हजार हेक्टरला पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतू प्रत्यक्षात या योजनांची सद्यस्थिती पाहता गेल्या ३-४ वर्षात या योजनांच्या कामांना गतीच आली नसल्याचे दिसून येते.तीन प्रमुख योजनांची प्राथमिक मंजुरी झाली आहे. परंतू पुढील प्रक्रिया मात्र अतिशय संथगतीने सुरू आहे. छोट्याछोट्या योजना असतानाही या कामांना गती मिळत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर सरकारी नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.कालेश्वरम प्रकल्पाच्या गतीने सदर योजनांचे काम झाले असते तर आतापर्यंत या योजनांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे शक्य झाले असते. परंतू प्रत्यक्षात तसे झालेले नाही.टेकडा सिंचन योजना १४ वर्षांपासून वनवासातसिरोंचा तालुक्यात टेकडा फाट्यापासून ८ किली अंतरावर प्राणहिता नदीवर प्रस्तावित असलेल्या टेकडा उपसा सिंचन योजनेची मागणी अनेक वर्षांपूर्वीची आहे. ३७ कोटी ३५ लाख रुपये किमतीच्या या योजनेतून २००० हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यासाठी ४.२३ किमी लांबीचा टेकडा मुख्य कालवा आणि ३.९० किमी लांबीच्या नेमडा मुख्य कालव्याद्वारे सिरोंचा तालुक्यातील १४ गावांना सिंचनाची सोय होणार आहे. या योजनेसाठी ६७.०१५ हेक्टर खासगी तर ६ हेक्टर वनक्षेत्राची आवश्यकता आहे. या योजनेला १९ मे २००५ रोजी मंजुरी मिळाली आहे. पण गेल्या १४ वर्षात या योजनेचा अंतिम सर्वसाधारण आराखडा तयार झालेला नाही.१२ गावांची पेंटीपाका योजना थंडबस्त्यातसिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेजच्या पाणी पसाºयातून नदीच्या डाव्या तिरावर पेंटीपाका उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. ही योजना गोदावरी या मुख्य खोºयाच्या उर्वरित गोदावरी (जी-१०) या उपखोºयाअंतर्गत येते. गोदावरी पाणी तंटा लवादानुसार जी-१० या उपखोºयात महाराष्टÑ राज्याला २८.३२ दलघमी पाणी वापराचे हक्क आहे. योजनेची किंमत ४४.७५ कोटी असून सिंचन क्षमता २२१८ हेक्टर आहे. त्यासाठी ६.५४ किमी लांबीचा डाव्या कालवा तर २१० मीटर लांबीच्या उजव्या फिडर कॅनलद्वारे पेंटीपाका लघु पाटबंधारे तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.या योजनेतून आयपेठा, तुमनूरमाल, तुमनूरचेक, पेंटीपाकाचेक, मुगापूर, पेंटीपाका वेस्टलँड, मृदुक्रिष्णापूर, राजनपल्ली, आरडा, मदीकुंठा, जामनपल्ली वेस्टलँड व रामानुजापूर या १२ गावातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेला २६ मे २०१० रोजी मंजुरी मिळाली आहे. मात्र योजनेच्या कामाला अद्यापही गती आलेली नाही. योजनेचे संकल्पन करण्यासाठी आवश्यक माहिती मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक या कार्यालयास सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.रंगयापल्ली उपसा सिंचन योजना अडकली लालफितशाहीतसिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या डाव्या तिरावर मौजा पोचमपल्ली येथे प्रस्तावित असलेल्या या योजनेच्या मानचित्र अभ्यास अहवालास जलसंपदा विभाग नागपूरकडून १५ डिसेंबर २०११ नुसार मंजुरी मिळाली आहे. तसेच पाणी उपलब्धता प्रस्तावानुसार २९ सप्टेंबर २०१६ रोजी ६.५७१ दलघमी पाणी वापरास मंजुरी मिळाली आहे. १५ कोटी ७२ लाख रुपयांच्या या योजनेतून ८४८ हेक्टर शेतीला सिंचन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ७ किमी लांब कालवा बांधला जाणार आहे. या भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सिंचनाकरिता या योजनेशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे नक्षलदृष्ट्या संवेदनशिल भाग असूनही मंजुरी मिळाली. योजनेच्या सर्व्हेक्षण कामासाठी निविदा काढण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतू अजूनही हे काम लालफितशाहीत अडकून आहे.