शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य संचालकांकडून पाहणी

By admin | Updated: November 22, 2014 23:02 IST

जिल्ह्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून धानोरा व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले. याबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्य संचालक

धानोरा : जिल्ह्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून धानोरा व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले. याबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्य संचालक यांनी धानोरा ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. भेटीदरम्यान आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी प्रत्यक्ष रूग्णांशी संवाद साधून प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्याचबरोबर रूग्णालय प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपचाराबाबतही रूग्णांना विचारले. धानोरा ग्रामीण रूग्णालयातील दोन डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रूग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही. बऱ्याचवेळा गडचिरोलीला रूग्ण रेफर करावा लागतो. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, संपूर्ण राज्यात ४० टक्के डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. राज्यातील जागा भरण्याचा विचार शासन करीत आहे. धानोरा ग्रामीण रूग्णालयाला तत्काळ डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, असे आदेश उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना दिले. यावेळी सहायक हिवताप अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर, सहाय्यक संचालक डॉ. कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. रविंद्र ढोले, डॉ. काशिद, डॉ. धुर्वे उपस्थित होते.