शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:09 IST

एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांनी चळवळीला रामराम करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिघांवर एकूण आठ लाख रूपयांचे बक्षीस होते.

ठळक मुद्देतिघांवर मिळून आठ लाखांचे बक्षीस : २०१७-१८ या वर्षात ३५ नक्षलवाद्यांनी सोडली चळवळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांनी चळवळीला रामराम करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिघांवर एकूण आठ लाख रूपयांचे बक्षीस होते.रजिता ऊर्फ सिरोंती माधुराम कुरचामी (२६), जितेंद्र ऊर्फ परदेशी बाजीराव पदा (२१), तिरूपती ऊर्फ पेंटा सुरा वेलादी (२०) असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे नावे आहेत. रजिता कुरचामी ही एप्रिल २०१० मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. आॅगस्ट २०११ पासून २०१५ पर्यंत ती चातगाव दलममध्येच कार्यरत होती. तिचा एकूण सहा पोलीस-नक्षल चकमकीत सहभाग असून दोन खून व एक जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जितेंद्र पदा हा जानेवारी २०१७ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. मार्च २०१८ पर्यंत दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर दोन लाख रूपयांचे बक्षीस होते. तिरूपती वेलादी हा जून २०१६ मध्ये अहेरी दलममध्ये भरती झाला. आॅक्टोबर ते मे २०१८ पर्यंत कंपनी क्र. १० च्या सदस्यपदावर कार्यरत होता. त्याचा एका पोलीस-नक्षल चकमकीत सहभाग आहे. त्याच्यावर चार लाख रूपयांचे बक्षीस होते. या सर्वांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, ए.राजा यांच्या समोर आत्मसमर्पण केले.पोलीस विभागाने आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पीतांना भूखंड, आर्थिक मदत, रोजगाराची उपलब्धतता, नसबंदी रिओपनिंग यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत आहे. २०१७-१८ यावर्षात एकूण ३५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पीतांकडून प्रेरणा घेऊन लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी दलममध्ये कार्यरत असलेले आणखी काही सदस्य आत्मसमर्पण करतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी