शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेत फसवणूक केली नाही

By admin | Updated: September 28, 2016 02:24 IST

सरस्वती श्यामसुंदर भोयर (६५) यांच्या शस्त्रक्रियेत कोणतीही फसवणूक केलेली नाही.

पत्रकार परिषद : शिवनाथ कुंभारे यांचा दावागडचिरोली : सरस्वती श्यामसुंदर भोयर (६५) यांच्या शस्त्रक्रियेत कोणतीही फसवणूक केलेली नाही. वर्तमानपत्रामध्ये वृत्त प्रकाशित करून हॉस्पीटलला हेतूपुस्सर बदनाम करण्याचे काम केले जात आहे, असा दावा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल गडचिरोलीचे संचालक डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात माहिती देताना डॉ. कुंभारे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. विवेक आत्राम व डॉ. अनंत कुंभारे म्हणाले की, सरस्वती श्यामसुंदर भोयर (६५) यांची सोनोग्राफी डॉ. अनंत कुंभारे यांनी ६ जुलै २०१६ ला केली. सोनोग्राफीमध्ये चार लिटर पाणी असलेला गोळा दिसला. ओव्हेरीयन सिप्ट या असे त्या गोळ्याचे निदान झाले व रिपोर्ट दिला गेला. पेशंटला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दिपचंद सोयाम व डॉ. यशवंत दुर्गे यांनी तपासले. दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी आॅपरेशनचा सल्ला दिला. १८ जुलै २०१६ ला डॉ. यशवंत दुर्गे यांनी आॅपरेशन केले. डॉ. विवेक आत्राम यांनी सुंगनी दिली, असे सांगितले. दरम्यान या पत्रकार परिषदेत डॉ. दुर्गे यांनी आॅपरेशनमधील तांत्रिक बाबींची माहिती दिली. लघवीच्या पिशवीमध्ये चार लिटर पाणी होते. सेप्टम होते. लघवीचे छिद्र निमुळते होते. डॉक्टरांनी नळी टाकली. लघवीच्या पिशवीच्या संवेदना व टोन नव्हते. पेशंटचे वय ६५ वर्ष असल्याने सध्या प्रकृती सुधारत आहे. डॉ. दुर्गे यांच्या देखरेखीखाली पेशंट आहे. अंदाजे २२ हजार रूपये खर्च येईल, असे नातलगांना सांगण्यात आले. नातलगांकडून आॅपरेशनला मान्यता देण्यात आली. पेशंटला २३ जुलै २०१६ ला सुटी देण्यात आली. पुन्हा तिला चार दिवस भरती ठेवावे लागले. परत त्यांना पाच हजार रूपये खर्च आला. त्यामुळे शस्त्रक्रियेत डॉ. कुंभारे यांनी फसवणूक केली, हे वामन भोयर यांचे म्हणणे तथ्यहिन आहे. दवाखान्याला व व्यक्तीला बदनाम करण्यासाठी वर्तमानपत्र बातम्या देत आहे, असे मत डॉ. कुंभारे यांनी यावेळी केले. वयोमानाने रिकर्व्हर व्हायला वेळ लागू शकतो. औषधोपचाराचा खर्चही लागू शकतो, हे सत्य आहे. मात्र यात पेशंटीची फसवणूक झालेली नाही. यावेळी डॉ. कुंभारे यांनी १९७३ पासून गडचिरोलीत सेवाभावाने आरोग्यसेवा केलेली आहे, याची माहिती सर्वांना आहे. मी सामाजिक बांधिलकीतून काम करीत आहो, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. आखाडे, पंडीत पुडके, श्रीकांत भृगूवार आदी उपस्थित होते.