शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पेसाविरोधी आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

By admin | Updated: August 11, 2014 23:55 IST

महामहिम राज्यपाल यांनी ९ जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार नोकरी संबंधीचा पेसा कायदा गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत आदिवासींचीच भरती करण्यासंदर्भात लागू केला.

गडचिरोली : महामहिम राज्यपाल यांनी ९ जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार नोकरी संबंधीचा पेसा कायदा गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत आदिवासींचीच भरती करण्यासंदर्भात लागू केला. त्यामुळे जिल्ह्यातील गैरआदिवासींवर नोकरीतून हद्दपार होण्याची वेळ आली आहे. राज्यपालांनी अधिसूचनेनुसार जाहीर केलेला नोकरी संबंधीचा पेसा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून इंदिरा गांधी चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. नोकरीसंबंधीचा पेसा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हा गडचिरोली, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, एनएसयूआय, युवाशक्ती संघटना, गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेस, सोनार समाज सेवा संस्था गडचिरोली, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्यासह जिल्ह्यातील इतर संघटनांनी गैर आदिवासी युवकांनी नोकरी संबंधीच्या पेसा कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी २० आंदोलकांनी साखळी उपोषण केले. दरम्यान काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, के. एस. भडके, सुनील वडेट्टीवार, अतुल मल्लेलवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, शहराध्यक्ष सुनील खोब्रागडे, बाबुराव बावणे, डी. डी. सोनटक्के, राकेश रत्नावार, नंदू वाईलकर, तुळशीदास भोयर, घनश्याम वाढई, बाशिद शेख, मनीष डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी ९ जून २०१४ चे राज्यपालांनी काढलेले परिपत्रक दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. हे आंदोलन मागण्यापूर्ण होईलपर्यंत सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)