शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

गडचिरोलीतील शहिदांच्या मुला-मुलींना जवाहरलाल दर्डा फाउंडेशनचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 05:45 IST

विजय दर्डा यांच्या हस्ते उच्च शिक्षणासाठी दहा लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : असामान्य शौर्य दाखवून गडचिरोली व राज्यात शांतता नांदावी, म्हणून प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांच्या कुटुंबांची, पाल्यांची जबाबदारी समाजाची आहे. तीच जाणीव ठेवून लोकमतच्या पुढाकाराने जवाहरलाल दर्डा फाउंडेशनने शहिदांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी भरभक्कम आधार देण्याचे पाऊल उचलले आहे. बुधवारी गडचिरोली पोलिस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभीच्या २० पाल्यांना प्रत्येकी ५० हजार अशी एकूण दहा लाखांची मदत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलाेत्पल, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे (नक्षल अभियान), अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी यावेळी लाेकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशाेक जैन, ‘लाेकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र, ‘लाेकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, वितरण विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संतोष चिपडा, तसेच शहीद पोलिसांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

देशासाठी शहीद झालेले सैनिक असाेत की, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पाेलिसांचे कुटुंबीय, ‘लाेकमत’ने नेहमीच त्यांचे प्रश्न हिरिरीने मांडले. मदतीसाठी पुढाकार घेतला. यापुढेही शहिदांच्या कुटुंबीयांच्या समस्या साेडविण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी दिली. ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि ‘लाेकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा व वारसा आमच्या हाती सोपविला. यंदा त्यांची जन्मशताब्दी साजरी करीत असताना कारगिल विजयदिनी उणे २२ अंश थंडीत द्रास येथे कारगिल स्मारकाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी उबदार घरे बांधून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. मुले ही राष्ट्रीय संपत्ती आहेत. त्यामुळे शहिदांच्या मुलांना शिक्षणासाठी यापुढेही ‘लाेकमत’ समूह मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पाेलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील २१२ शहिदांच्या बलिदानांमुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागामुळेच नक्षलवादावर मात करता आली, याची जाणीव प्रशासनाला आहे. पूर्वी गडचिराेली जिल्ह्यातून बदली झाल्याशिवाय पाेलिस अधिकाऱ्याचे लग्न जुळत नव्हते. आता गडचिराेली जिल्ह्यात येण्यासाठी १०० पाेलिस अधिकारी वेटिंगवर आहेत. या स्थितीवरून जिल्ह्याच्या वातावरणात किती बदल झाला, हे दिसून येते.

चित्रांच्या विक्रीतून निधीलोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन,  विजय दर्डा यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन व विक्री मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली होती. त्या चित्र विक्रीतून आलेल्या रकमेतील १० लाख रुपयांचा निधी गडचिराेली जिल्ह्यातील २० शहीद पाेलिसांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून देण्यात आला.

समिती ठरविणार आणखी मदतीचे स्वरूपnशहिदांच्या पाल्यांना दर्जेदार उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी जवाहरलाल दर्डा फाउंडेशन एक व्यवस्था तयार करीत असून यापुढेही गडचिरोलीतील वरिष्ठ पोलिस अधिकारी व ‘लाेकमत’ प्रतिनिधींची समिती गरजू पाल्यांची निवड करील. nया समितीच्या शिफारशींच्या आधारे आवश्यकतेनुसार मुला-मुलींना आर्थिक मदत दिली जाईल आणि तिचा योग्य विनियोग होत आहे की नाही, यावर देखरेख केली जाईल, असे विजय दर्डा यांनी यावेळी जाहीर केले. n नक्षल विभागाचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील व गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली