शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा; तेलंगणातील टोळीचा केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरंचा उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगारामपेठा गावात पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पोलिसांची तुकडी आणि शीघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान शनिवारी नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान, तेलंगणामधून दामरंचामार्गे छत्तीसगडकडे १० नग कार्डेक्स वायरचे बंडल (एकूण लांबी ३,५०० मीटर) आणि इतर नक्षल साहित्य नेले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित ४ इसमांकडून ते साहित्य जप्त करून त्यांना अटक केली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांना हिंसक कारवाया घडवून आणण्यासाठी लागणारे स्फोटकात वापरले जाणारे साहित्य पुरविणाऱ्या चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यातील दोघे तेलंगणा राज्यातील आहेत. अहेरी तालुक्यातील एक आरोपी पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे. हे साहित्य छत्तीसगड राज्यात जात होते, हे विशेष.प्राप्त माहितीनुसार, जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरंचा उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगारामपेठा गावात पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पोलिसांची तुकडी आणि शीघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान शनिवारी नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान, तेलंगणामधून दामरंचामार्गे छत्तीसगडकडे १० नग कार्डेक्स वायरचे बंडल (एकूण लांबी ३,५०० मीटर) आणि इतर नक्षल साहित्य नेले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित ४ इसमांकडून ते साहित्य जप्त करून त्यांना अटक केली. नक्षलवाद्यांना हे साहित्य पुरवठा करणाऱ्यांमध्ये राजू गोपाल सल्ला (३१ वर्षे) रा.आसिफनगर, जि.करीमनगर, तेलंगणा,  काशिनाथ उर्फ रवि मुल्ला गावडे (२४) रा.भंगारामपेठा ता.अहेरी, साधू लच्चा तलांडी (३०), तसेच मोहम्मद कासिम शादुल्ला रा.बाबुपेठ, आसिफनगर जि.करीमनगर, तेलंगणा या चार आरोपींना घटनास्थळावरून पकडण्यात आले. याशिवाय छोटू उर्फ सिनू मुल्ला गावडे रा.भंगारामपेठा ता.अहेरी हा फरार झाला आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर अधीक्षक समीर शेख (प्रशासन), तसेच जिमलगट्टाचे एसडीपीओ सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पार पडली. 

 बॉम्ब, हँडग्रेनेडसाठी वापर छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातही घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी नक्षलवादी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. अटकेतील नक्षल समर्थक आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या, कार्डेक्स वायरद्वारे बनावट बीजीएल, हँडग्रेनेड,  बॉम्ब आणि आयईडी आदी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. येत्या टीसीओसी सप्ताहादरम्यान सदर स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार होता.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी