शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहसंचालकांनी केली शेततळे, बोडीच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 01:24 IST

नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ...

शेतकऱ्यांशी साधला संवाद : योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनएटापल्ली : नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली व चंदनवेली येथे करण्यात आलेल्या शेततळे व बोडी नूतनीकरणाच्या कामाची पाहणी गुरूवारी केली. तालुका कृषी अधिकारी कार्यालय एटापल्लीमार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षात तालुक्यात जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली. नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी शेततळे व बोडी नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेततळे, बोडी नूतनीकरण, मातीनाला बांध या कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा झाली. रबी हंगामात भाजीपाला पिके व इतर दुबार पिके घेण्यास या कामांमुळे मदत झाली, असे शेतकऱ्यांनी कृषी सहसंचालक विजय घावटे यांना सांगितले.मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवून कृषिक्रांती घडवावी, असे आवाहन कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी यावेळी केले. याप्रसंगी जि. प. सदस्य कारू रापंजी, एटापल्लीचे तालुका कृषी अधिकारी के. ई. हडपे, मंडळ कृषी अधिकारी ए. ए. भोयर, एस. सी. चव्हाण, वासनिक, बेंडकाळे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)शेततळे योजनेच्या सहभागाबाबत कृषी विभागाचे कौतुक‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत एटापल्ली तालुक्यातील सर्वाधिक ३३३ शेतकरी लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात एटापल्ली तालुक्यात जलसंधारणाची अनेक कामे पूर्ण करण्यात आली. याबद्दल विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी तालुका कृषी अधिकारी तसेच सर्वक्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भेटीदरम्यान कौतुक केले.