शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धानपीक रोवणीला वेग

By admin | Updated: February 7, 2017 00:44 IST

सिरोंचा तालुक्यात खरीप धान पिकाबरोबरच उन्हाळी धान पिकाचीही लागवड केली जाते. मागील १५ दिवसांपासून उन्हाळी धान पिकाच्या रोवणीला वेग आला आहे.

तीन हजार हेक्टरवर लागवड : शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त; यावर्षी क्षेत्र वाढलेसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात खरीप धान पिकाबरोबरच उन्हाळी धान पिकाचीही लागवड केली जाते. मागील १५ दिवसांपासून उन्हाळी धान पिकाच्या रोवणीला वेग आला आहे. सिरोंचा तालुक्यातील वडधन, अंकिसा, आसरअल्ली व सिरोंचा शहरासभोवतालच्या गावांमध्ये उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. सिरोंचा भागात भूजलपातळी मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरातील शेतकरी शेतात बोअरवेल खोदून या बोअरवेलच्या पाण्याच्या मदतीने उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतात. सिरोंचा तालुक्यात हवामान धानपिकासाठी योग्य असल्याने बहुतांश शेतकरी धानपिकाचीच लागवड करण्यास पसंती दर्शवितात. खरीप हंगामात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. खरीपातील धानपीक निघताच उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यास सुरूवात होते. १५ दिवसांपूर्वी टाकलेले धानाचे पऱ्हे रोवण्यासाठी तयार झाल्याने शेतकरी वर्ग धानाची रोवणी करण्यास सुरूवात केली आहे. संपूर्ण तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाळी धान पिकाला तेलंगणा राज्यात मोठी मागणी आहे. गोदावरी नदीवर कालेश्वरदरम्यान पूल झाल्याने सिरोंचातील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे धानपिकाला चांगला भावही मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानपिकाखालील क्षेत्र वाढले असल्याचा अंदाज कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. धान पिकाची लागवड होणाऱ्या शेतातील बांध्यांमध्ये पाणी भरून ठेवले जात असल्याने पावसाळ्या प्रमाणे शेती दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)कुपनलिकांद्वारे सिंचनसिरोंचा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतामध्ये कुपनलिका (बोअरवेल) खोदल्या आहेत. या कुपनलिकांच्या मदतीने धानपिकाला सिंचन उपलब्ध करून दिले जाते. कुपनलिकेवर मोटारपंप बसविण्यात आला आहे. या मोटारपंपांच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात येतो. विहिरींच्या तुलनेत कुपनलिका अधिक आहेत.