शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

ग्राहक मंचाने मिळवून दिली विम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:37 IST

शेतात फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला तब्बल आठ वर्षानंतर जिल्हा ग्राहक मंचाने विम्याची रक्कम मिळवून देऊन तिला न्याय दिला आहे.

ठळक मुद्देविमा कंपनीला चपराक : तब्बल आठ वर्षानंतर मिळाला न्याय

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : शेतात फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला तब्बल आठ वर्षानंतर जिल्हा ग्राहक मंचाने विम्याची रक्कम मिळवून देऊन तिला न्याय दिला आहे.तक्रारकर्ती प्रमिला हनुमान वसाके मु.पो. वेलगूर, त. अहेरी, गडचिरोली, यांचे पती हनुमान दसरु वसाके यांचा शेतात फवारणी करताना विषारी किटकनाशक नाकातोंडात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रमिला वसाके यांचे पतीने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढलेला होता. त्यानुसार तक्रारकर्ती यांनी पतीच्या अपघाती मृत्यूनंतर तालुका कृषी अधिकारी अहेरी यांच्याकडे रितसर अर्ज केला व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र आठ वर्षे उलटूनही तक्रारकर्ती वसाके यांचा अपघाती विमा दावा मंजूर अथवा नामंजूर झाला याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले नाही. तक्रारकर्ती ही अशिक्षित व दुर्गम भागातील असल्याने तिला याबाबत वारंवार चौकशी करणे शक्य झाले नाही. शेवटी आपल्या नातेवाईकामार्फत २०१७ रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांच्याकडे माहिती अधिकार कायद्याखाली माहिती विचारली असता त्यांनी तक्रारकर्तीचा दावा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर यांनी नाकारल्याबाबत माहिती दिली. परंतु विमा कंपनीने दावा नाकारल्याबाबतची प्रत दिली नाही. तेव्हा तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक मंच गडचिरोली यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये विमा दाव्याची संपूर्ण रक्कम व नुकसान भरपाई तसेच इतर खर्च यांची मागणी केली.मंचासमोर तक्रार आल्यांनतर तक्रार दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर, तालुका कृषी अधिकारी अहेरी व कबाल इन्शुरन्स कंपनी यांना लेखी उत्तर दाखल करण्याबाबत नोटीस पाठविले. मंचाने पाठविलेल्या नोटीसला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नागपूर यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले व तक्रारीकर्तीने मागणी केलेली दाव्याची रक्कम अमान्य करीत तक्रार खारीज करण्याबाबत मंचास विनंती केली. मंचाने उभय पक्षाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. मंचाचे निष्कर्षानुसार तक्रारकर्ती ही अशिक्षित व आदिवासी बहूल भागातील महिला असल्यामुळे दावा नाकारल्याबाबतचे पत्र तक्रारकर्तीला प्राप्त झाल्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी पुराव्यानिशी सिध्द करु शकली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचा दावा मुदतबाह्य आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. असा मंचाने आपल्या निकालपत्रामध्ये म्हटले आहे.तक्रार अंशत: मंजूर करुन विमा दाव्याची रक्कम एक लाख रूपये, त्यावर १२ टक्के व्याज, मानसिक त्रासाकरिता १० हजार रूपये व तक्रारीचा खर्च पाच हजार रूपये विमा कंपनीने तक्रारकर्त्या विधवा महिलेलला द्यावे, असा आदेश मंचाचे प्रभारी अध्यक्ष रोझा खोब्रागडे, सदस्य सादिक झवेरी यांनी पारित केला. याकरिता तक्रारकर्तीतर्फे अधिवक्ता उदय क्षिरसागर व गैरअर्जदार विमा कंपनीतर्फे अधिवक्ता ए. सी. सूर्यवंशी यांनी काम पाहिले.कीटकनाशकाच्या बाधेने झालेला मृत्यू भरपाईस पात्रतक्रारकर्तीच्या पतीने विष प्राषन करुन आत्महत्या केली. याबाबतची विमा कंपनी कुठलेही पुरावे दाखल केले नाही. सद्यपरिस्थितीत विषारी औषधाची फवारणी करताना फवारणीबाबत आवश्यक माहिती नसल्याने विषारी औषध नाकातोंडात गेल्याने मृत्यू होत आहेत. त्यापैकीच हे एक प्रकरण असल्याचे मंचाने म्हटले.