शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: July 8, 2016 01:24 IST

तालुक्यातील देऊळगावनजीक इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी निलेश राठोड

वडिलांची पोलिसांत तक्रार : आरमोरीतील घटनाआरमोरी : तालुक्यातील देऊळगावनजीक इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी निलेश राठोड यांच्या पत्नीने गळफास घेऊन भाड्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. किशोरी उर्फ जानवी निलेश राठोड (२५) रा. बर्डी परिसर आरमोरी असे आत्महत्या केलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश राठोड हे बुधवारी कामानिमित्त नागपूर येथे गेले होते. दरम्यान घरी पत्नी किशोरी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथील रहिवासी असलेले मुलीचे वडील मोहन चव्हान यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दाखल केली. माझी मुलगी किशोरी हिला हुंड्यासाठी तिचे कुटुंबिय नेहमी मानसिक त्रास देत होते. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून कट रचून तिला जीवानिशी ठार करण्यात आले आहे, असे वडील चव्हान यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी मृतक किशोरीचे हिचे पती डॉ. निलेश राठोड व सासरे रामसिंग राठोड, सासू सविता राठोड, अक्षय राठोड व विष्णू आडे यांच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मृतक विवाहित महिला किशोरी हिचे शवविच्छेदन आरमोरीच्या रूग्णालयात करण्यात येणार होते. मात्र मृतक किशोरीचे वडील मोहन चव्हान यांनी या आत्महत्येसंदर्भात आक्षेप नोंदवून पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली. तसेच आरमोरी येथे किशोरी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू नका, गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करा, अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यामुळे किशोरी हिचे गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात गुरूवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)हत्या की आत्महत्या हे गुलदस्त्यातचगळफास घेऊन आत्महत्या केलेली किशोरी राठोड हिचे १० महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तिने आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात एमएससी भाग १ अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला होता. मात्र अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. यात तिचे वडील मोहन चव्हाण यांनी तिच्या कुटुंबियाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याने किशोरीची आत्महत्या आहे की, हत्या हे गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरमोरीचे पोलीस उपनिरिक्षक देवरे करीत आहेत.