शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चव्हेलातील सिंचन कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:28 IST

निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही.

ठळक मुद्दे३० लाखांचा खर्च पाण्यात : जुन्याच पाळीवर माती टाकून लाटला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व कंत्राटारांनी संगनमत करून बंधाºयाच्या बांधकामातील बराच पैसा जिरविला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.धानोरा येथून आठ किमी अंतरावर असलेल्या चव्हेला येथील शेतशिवारात माती बंधारा २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला. यासाठी ३० लाख रूपये मंजूर झाले. एका बाजूस मातीची पाळ व दुसऱ्या बाजूस डोंगराळ भाग आहे. बंधाऱ्यात पावसाचे पाणी जमा झाल्यानंतर माळंदा, चव्हेला, पवनी या गावातील हजारो एकर जमीन ओलीत होईल, असे नियोजन होते. मात्र पाळीला अनेक ठिकाणी छिद्र पडल्याने पाणी वाहून गेले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम केले असते तर साडेचार हजार एकर शेतजमिनीला सिंचन झाले असते. वेस्ट वेअरचे बांधकाम ५० फुट दूर अंतरावर होणे आवश्यक होते. मात्र जवळच बांधकाम करण्यात आले.सध्या अस्तित्त्वात असलेली पाळ चव्हेला वासीयांनी श्रमदानातून १० फुट उंच बांधली आहे. त्याठिकाणी थातुरमातूर काम करून सुमारे ३० लाख १४ हजार रूपये उचलण्यात आले आहेत. यामध्ये कंत्राटदार व अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे.बंधाºयाच्या पाळीला सिमेंट काँक्रिटची पिचिंग केले असते तर पाणी साचून राहिले असते. याचा लाभ ३०० शेतकऱ्यांना झाला असता. जंगली प्राण्यांनासुद्धा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असती. गावातील पाण्याची पातळी वाढली असती. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ३० लाख रूपये खर्च होऊनही सिंचनाची सुविधा मिळू शकली नाही, असा आरोप चव्हेलाचे उपसरपंच आनंदराव उसेंडी, माजी उपसरपंच हनमंतू नरोटे, ग्रामसभाध्यक्ष अमित नरोटे, निरंगू गावडे, बाजीराव आत्राम, ऋषी नरोटे यांनी केला आहे.बंधाºयाच्या भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. याचा अर्थ या बंधाऱ्याच्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासह स्थानिक कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात गुंतले असल्याचा स्पष्ट आरोप गावकऱ्यांनी केला असून याची चौकशीची मागणी केली आहे.आमदारांचे आश्वासन हवेतच विरलेआ. डॉ. देवराव होळी यांनी या बंधाऱ्याला भेट दिली होती. बंधाºयाचे बांधकाम बघून झाल्यानंतर या बंधाऱ्याला पर्यटन स्थळाच्या दृष्टीने विकसित केले जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच विरले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.या गावाने अनेक पुरस्कार पटकाविले. पुरस्काराच्या निधीतून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार, खासदारांनी या गावाच्या विकासासाठी एकही निधी दिला नाही, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री यांना यापुढे गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा गावकºयांनी दिला आहे.