शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

बुडीत मजुरीचे साडेनऊ लाख रूपये पडून

By admin | Updated: July 22, 2015 02:31 IST

सन २०१४-१५ या वर्षात ३०० हून अधिक गरोदर मातांसाठी मंजूर करण्यात आलेला ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी पंचायत समिती कार्यालयात पडून

गरोदर व स्तनदा माता वंचित : एटापल्ली पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरएटापल्ली : सन २०१४-१५ या वर्षात ३०० हून अधिक गरोदर मातांसाठी मंजूर करण्यात आलेला ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी पंचायत समिती कार्यालयात पडून असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. परिणामी तालुक्यातील गरीब गरजू गरोदर माता बुडीत मजुरीच्या रकमेपासून वंचित आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार मानव विकास मिशनच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील इतर मागास प्रवगाच्या गरोदर माताना प्रसुतीपूर्व दोन हजार रूपये, प्रसुतीनंतर दोन हजार असे एकूण चार हजार रूपये बुडीत मजुरी देण्याची तरतूद आहे. एटापल्ली पंचायत समितीला शासनाकडून २०१४-१५ या वर्षाचा बुडीत मजुरीचा ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी शासनाकडून २२ डिसेंबर २०१४ रोजी मिळाला. सदर निधी पंचायत समितीच्या बीडीएसवर उपलब्ध असल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील तोडसा, गट्टा, कसनसूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावातील गरोदर मातांना बुडीत मजुरी देणे, शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तपासणी करणे, गरोदर माता व स्तनदा मातांची तपासणी शिबिर आयोजित करून सदर निधी खर्च करावयाचा आहे. मात्र एटापल्ली पंचायत समिती प्रशासनाकडून ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील तीन आरोपी केंद्रांतर्गत ३६ उपकेंद्र व २०० च्या वर गावातील जवळपास ३३२ गरोदर व स्तनदा माता बुडीत मजुरीच्या लाभापासून वंचित आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन बुडीत मजुरीची रक्कम अदा करण्याच्या कार्यवाहीचे पंचायत समिती प्रशासनाला निर्देश द्यावे, अशी मागणी मातांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)