शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
5
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
6
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
7
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
8
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
9
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
10
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
11
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
12
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
13
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
14
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
15
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
16
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
17
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
18
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
19
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
20
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची अशीही थट्टा; रस्ताही नसताना बांधले पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:40 IST

Gadchiroli News घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासींची कशी थट्टा केली जातेय याचं जिवंत उदाहरण भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा गावांमध्ये दिसून येते.

ठळक मुद्दे लाखोंचा खर्च पाण्यात नियोजन कशाची ? फायदा कोणाचा ?

 लोकमत न्यूज नेटवर्क  

गडचिरोली:  घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासींची कशी थट्टा केली जातेय याचं जिवंत उदाहरण भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा गावांमध्ये दिसून येते. गावात जाण्यासाठी साधा कच्चा रस्ताही नसताना पायवाटेच्या मार्गावर चक्क चार ते पाच पूल (कालवट) तयार करण्यात आले.अशा धक्कादायक प्रकार भामरागडपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पदहूर गावांमध्ये समोर आला आहे. 

भामरागड-कोठी मार्गावरुन आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर 20 ते 25 लोकवस्ती असलेलं पदहूर गाव  मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत या गावाचा समावेश आहे. गावात शंभर टक्के आदिवासी नागरिक राहतात. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही येथील आदिवासींनी विकासाची वाट बघितलेली नाही. एकीकडे आधुनिकीकरणात थरावरथर अशा टोलेजंग इमारती शहरात उभ्या राहत आहेत. समुद्राच्या पाण्यातून रेल्वे धावणार आहे. तर दुसरीकडे मात्र गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी पक्क्या रस्त्याअभावी आजही नरक यातना सहन करत आहेत.

गरज नसलेल्या ठिकाणी पुलाचे बांधकाम-पदहूर गावातील आदिवासींना भामरागड येण्यासाठी पायवाटेत मोठा नाला पडतो. या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. आश्चर्याची बाब म्हणजे जिथे गरज नव्हती, अशा चार ते पाच ठिकाणी काही वर्षांपूर्वी पुलाचे (कालवट) बांधकाम करण्यात आले आहे. मात्र कच्चा रस्ताही नसल्याने या पुलाचा कोणताही उपयोग होत नाही.तर पुल बांधकाम नियोजन कोणासाठी लोकप्रतिनिधींचा जवळचा टेकेदारांना काम उपलब्ध करुन देण्याची उद्धेश सफल झाला मात्र गावकऱ्यांना जाण्या येण्यासाठी  वाहनांची वाहतूक तर दूरच आहे.नागरिक वाहतूक सुरु झाल्या पुर्वीच पुलाला सध्या मोठे भगदाड पडले आहे. तर वाहन चालणार का ? त्यामुळे विनाकारण बांधण्यात आलेल्या पुुलाच्या दर्जाची प्रचिती येते.

गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा, तीही करोनामुळे  बंद अवस्थेत आहे. दोन वर्षापूर्वी अंदाजे पाच लाख रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी नळ योजना गावात सुरू करण्यात आली. नळयोजना सुरू झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी आशा होती. मात्र एक वर्ष लोटत नाही  नळयोजना बंद पडली. आता दोन  वर्ष लोटली असून आजही नळयोजना बंद आहे. सदर योजनेचा उप करणे ह्या भंगार मध्ये जमा होणारच . याकडे ना ग्रामपंचायतीचे लक्ष, ना प्रशासनाचे. अशी दुहेरी नळ योजनेचा अवस्था दिसत आहे.

टॅग्स :Governmentसरकार