शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या पिकात भाजीपाल्याचा यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:15 IST

धानाचे पीक आणि भाजीपाला हे समीकरण तसे जुळत नाही. पण प्रयोगशिलतेवर भर देत येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत चक्क धानाच्या पिकातच दोडक्याचे वेल बहरविण्याचा यशस्वी प्रयोग ‘आत्मा’ने साकारला आहे. असाच प्रयोग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात करून स्वत: वापरण्यासोबतच विक्रीसाठीही भाजीपाला पिकवू शकतात.

ठळक मुद्दे‘आत्मा’ची कल्पना प्रत्यक्षात : कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत बहरले दोडके

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानाचे पीक आणि भाजीपाला हे समीकरण तसे जुळत नाही. पण प्रयोगशिलतेवर भर देत येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत चक्क धानाच्या पिकातच दोडक्याचे वेल बहरविण्याचा यशस्वी प्रयोग ‘आत्मा’ने साकारला आहे. असाच प्रयोग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात करून स्वत: वापरण्यासोबतच विक्रीसाठीही भाजीपाला पिकवू शकतात.दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना सकस आणि ताजा भाजीपाला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या अपुऱ्या सिंचन सुविधा असणाऱ्या जिल्ह्यात तर खरीपातील धानाच्या पीकाशिवाय इतर पीक घेण्याची कल्पनाही शेतकऱ्यांच्या डोक्यातही येत नाही. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबांना दैनंदिन वापरासाठी भाजीपाला मिळत नाही. या परिस्थितीचा विचार करून आता आदिवासी नागरिकांच्या घरालगत परसबाग फुलवून त्यात भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. मात्र त्याआधीच आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत धानपिकासोबत भाजीपाला लागवडीची कल्पना मांडली.अनेक दिवस पाण्यात राहणाऱ्या धानाच्या पीकासोबत त्याच जमिनीत भाज्यांची लागवड करणे शक्य नव्हते. त्यासाठी प्लास्टिकच्या पोत्यांना अर्ध्यातून कापून त्यात माती भरण्यात आली. ते धानाच्या पीकात १०-१० फुटांवर मांडण्यात आले. त्यानंतर पोत्यातील मातीचा शेतातील मातीशी थेट संबंध येण्यासाठी पोत्याचा खालील भाग कापण्यात आला. त्या पोत्यात विविध प्रकारच्या दोडक्याच्या बिया लावण्यात आल्या. खरीपाच्या धानासोबतच पोत्यातील दोडक्याचे वेलही अल्पावधीतच बहरून त्याला चांगले दोडके लागले.पोत्याचे खालील तोंड मोकळे असल्याने शेतजमिनीतून मिळणारे पोषक घटकही पोत्यातील मातीला मिळाले. शिवाय आवश्यक तेवढेच पाणी पोत्यातील मातीत राहून दोडक्याच्या वेलांची योग्य वाढ झाली. याच पद्धतीने खरीप आणि रबी हंगामातही वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पन्न घेता येऊ शकते, असे आत्माकडून सांगण्यात आले.शेतकऱ्यांना धानाच्या पीकासोबतच भाजीपालाही घेता येऊ शकतो हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पद्धतीचा प्रयोग जरूर करावा. त्यांना योग्य ते मार्गदर्शन ‘आत्मा’कडून केले जाईल.- डॉ.प्रकाश पवार, प्रकल्प संचालक, आत्मा