शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

अनुदानातून मिळाले १७ कोटी

By admin | Updated: May 1, 2015 01:27 IST

स्थानिक नगर परिषदेला विविध योजनांच्या माध्यमातून २०१४-१५ या वर्षात सुमारे...

गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेला विविध योजनांच्या माध्यमातून २०१४-१५ या वर्षात सुमारे १६ कोटी ६४ लाख २० हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले असून या अनुदानातून शहरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. नगर परिषद कराच्या माध्यमातून महसूल गोळा करीत असले तरी ही रक्कम अत्यंत मर्यादित राहत असून यातील बहुतांश निधी दिवाबत्ती, पाणीपुरवठा, शहराची स्वच्छता यावरच खर्च होते. त्यामुळे मोठी विकास कामे करायची असल्यास शासनाच्या अनुदानाची वाट बघावी लागते. राज्य व केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे अनुदान वितरित करते. या अनुदानातून विविध विकास कामे केली जातात. काही अनुदान मात्र शासनाने घालून दिलेल्या अटीनुसारच खर्च करावे लागते. गडचिरोली नगर परिषदेला २०१४-१५ या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ५० लाख ५० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. केंद्रीय शहर विकास योजनेतून ६८ लाख रूपये मिळाले. शहराच्या स्वच्छतेत नालीचे अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डात चांगल्या नाल्या असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक वार्डात नालीचे बांधकाम होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नाली बांधकाम व दुरूस्तीकरिता शासनाकडून अनुदान वितरित केल्या जाते. २०१५-१५ या वर्षात नाली बांधकाम दुरूस्तीसाठी २६ लाख रूपये प्राप्त झाले. दलित वस्त्यांचा विकास व्हावा, दलित नागरिकांना स्वच्छ पाणी, रस्ते, वीज उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने नागरी दलित वस्ती सुधार योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. बहुतांश वस्त्यांमध्ये या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेतून १२ लाख २० हजार रूपयांचा निधी मिळाला आहे. रस्ता अनुदानासाठी ५५ लाख रूपये तर स्थानिक विकास निधीतून ४० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत बीपीएलधारक नागरिकांना १०० टक्के अनुदानावर घर बांधून दिल्या जातो. यासाठी एक लाख रूपयांचा अनुदान उपलब्ध करून दिला जातो. २०१४-१५ मध्ये ६५ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत १२ लाख, अल्पसंख्यांक अनुदानातून १५ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. १३ व्या वित्त आयोगातून दोन कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत ५० लाख रूपये मिळाले आहेत. विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या क्षेत्रासाठी मागास क्षेत्र अनुदान निधीतून निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गत गडचिरोली शहराला भरीव मदत झाली आहे. सुमारे एक कोटी २५ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. नगरोत्थान अनुदानातून जिल्हास्तरावरच्या योजनेतून सात लाख रूपये, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण गणणेचे तीन लाख, अंगणवाडी केंद्र बांधकामासाठी १० लाख रूपये, सार्वजनिक शौचालय बांधकाम दुरूस्तीसाठी पाच लाख, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातून १० लाख, आपत्ती व्यवस्थापनातून पाच लाख असा एकूण सर्वच योजनांवर सुमारे १६ कोटी ६४ लाख २० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत.