शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सेमाना ट्रस्टची उपविधी बदविली

By admin | Updated: January 23, 2017 01:00 IST

येथील चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानच्या सभासदत्वासाठी सभासद शुल्क म्हणून ११ हजार व वार्षिक वर्गणी पाच हजार रूपये भरावे लागतील.

नागपूरच्या कार्यालयात आव्हान देणार : कलंत्री, गडपल्लीवार यांची माहिती गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानच्या सभासदत्वासाठी सभासद शुल्क म्हणून ११ हजार व वार्षिक वर्गणी पाच हजार रूपये भरावे लागतील. अशा प्रकारची सर्वसाधारण घटकातील नागरिकांना गैरसोयीची नवीन उपविधी श्री क्षेत्र सेमाना देवस्थानची तयार करण्यात आली आहे व या उपविधीला सहायक धर्मदाय आयुक्त गडचिरोली यांनी मान्यता दिली आहे. सदर उपविधी अन्यायकारक असल्याने नागपूर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात आव्हान देण्यात येईल, अशी माहिती सेमाना देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सत्यनारायण कलंत्री व नामदेवराव गडपल्लीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, सार्वजनिक न्यासाचे व्यवस्था व कारभाराबाबत मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था १९५० चे कलम (अ) नुसार सदर नवीन योजना (उपविधी) ही सहायक धर्मदाय आयुक्त प्रताप सातव यांनी केली आहे. सदर ट्रस्टच्या कामाच्या गैरव्यवाराबाबत सहायक धर्मदाय आयुक्तांकडे यापूर्वीच तक्रार करण्यात आली आहे. मागील ११ वर्षांपासून संस्थेच्या विश्वस्त मंडळातील विश्वस्तांची कोणतीही सभा घेण्यात आलेली नाही. सभासदाच्या स्वाक्षरी व्यतिरिक्त मनमर्जीने संस्थेचे अध्यक्ष रामस्वरूप काबरा यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे दाखविले आहे. आपल्या मर्जीतील त्र्यंबक रोडे यांना अध्यक्ष व कांतीभाई सूचक यांना सचिव झाल्याचे दर्शविले आहे. कार्यकारीणीत बदल न करताच पद असल्याचे दर्शवून पत्र व्यवहार सुरू केला आहे, असहीे कलंत्री म्हणाले.सहायक धर्मदाय आयुक्तांवर कारवाई कराधनदांडग्या सभासदांना हाताशी धरून श्री क्षेत्र सेमाना देवस्थान ट्रस्टच्या नव्या उपविधीचा आदेश गडचिरोलीचे सहायक धर्मदाय आयुक्त प्र. रा. सातव यांनी काढले आहेत. या उपविधीच्या आदेशात अनेक बाबी अन्यायकारक आहेत. मागास व सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तींना ट्रस्टचे सभासद होता येत नाही. त्यामुळे संबंधित सहायक धर्मदाय आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कलंत्री व गडपल्लीवार यांनी केली.