शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी करणार ५० तास काम

By admin | Updated: December 3, 2014 22:50 IST

स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता दूत म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक

गडचिरोली : स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता दूत म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ५० तास काम करवून घेतले जाणार आहे. सदर अभियान गोंडवाना विद्यापीठ मुनिजन कार्यक्रम म्हणून राबविणार आहे. मुनिजन कार्यक्रमाचा शुभारंभ गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ. दडवे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राठोड, रासेयो कार्यक्रम समन्वयक डॉ. ईश्वर मोहुर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम पडघन, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, कार्यकारी अभियंता सोनटक्के, उपअभियंता गावड, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मनोहर हेपट, काशिनाथ देवगडे, विजया गद्देवार आदी उपस्थित होते. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांना सहभागी करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत म्हणून नेमेले जाणार आहे. या अभियानांतर्गत किमान ५० तास काम करायचे असून जो महाविद्यालय वर्षभर योग्यप्रकारे उपक्रम राबविणार अशा महाविद्यालयांना जिल्हा पातळीवर कुलगुरू चषक तसेच विद्यापीठ पातळीवर मुख्यमंत्री चषक दिल्या जाईल. महाविद्यालयाचे मुख्यमापन चौकशी समितीद्वारे भेट देऊन केले जाईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले. दरम्यान सदर अभियानाविषयी चर्चा करण्यात आली व उपस्थितांकडून सूचना मागविण्यात आल्या. या चर्चेत प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, प्राचार्य डॉ. हंसा तोमर, प्राचार्य डॉ. मंडल, प्रा. डॉ. प्रदीप घोरपडे, प्रा. डॉ. संजय गोरे, काशिनाथ देवगडे, प्रा. डॉ. सुरेश खंगार, प्रा. डॉ. दुधे, प्रा. डॉ. गहाणे, प्रा. डॉ. गिरडे आदींनी सहभाग घेतला. व कार्यक्रम राबविण्यासंदर्भात सूचना केल्या. स्वच्छता उपक्रम राबविण्यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम पडघन, मुख्याधिकारी बन्नोरे, मनोहर हेपट यांनी उपक्रम राबविण्यासाठी शौचालय बांधणे, शोषखड्डे तयार करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन याविषयी शाळा, महाविद्यालय व गावकऱ्यांमध्ये जाणीव जागृती करणे आदी बाबींवर मार्गदर्शन केले. संचालन रासेयो समन्वयक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले. त्यानंतर मुनिजन कार्यक्रमाचा शुभारंभ फलकाचे अनावरण प्राचार्य डॉ. हंसा तोमर यांच्याहस्ते करण्यात आला व विद्यापीठ परिसरालगत सप्तपर्णीच्या १०० झाडांची लागवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)