शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध व थंडगार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:06 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देगडचिरोली प्रकल्प : २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये योजना मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आली असून प्रकल्पाअंतर्गत असलेल्या २४ आश्रमशाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असून २०१८ या नवीन वर्षापासून सर्वच २४ शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.गडचिरोली प्रकल्पाआंतर्गत कारवाफा, सोडे, रांगी, पेंढरी, गोडलवाही, मुरूमगाव, येरमागड, कोरची, मसेली, रामगड, सोनसरी, अंगारा, घाटी, भाकरोंडी, कुरंडी माल, रेगडी, पोटेगाव, मार्र्कंडादेव, भाडभिडी, कोटगूल, गॅरापत्ती व गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळा अशा मिळून एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. आदिवासी विकास विभागाच्या योजनेनुसार सर्वच २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्राची योजना मंजूर करण्यात आली आहे. प्रती आश्रमशाळा ५० हजार रूपयातून हे यंत्र बसविले जात आहे.गडचिरोली प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे मिळून जवळपास १० हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये बोअरवेल, हातपंप, विहीर आदी पाणीपुरवठ्याच्या सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना गढूळ व दूषित पाण्यापासून जलजन्य आजार होऊ नये, यासाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याच्या योजनेचे नियोजन करण्यात आले. यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ. विपीन ईटनकर व सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डॉ. ईटनकर यांनी राज्य शासनाकडून आश्रमशाळा व वसतिगृहाच्या या सुविधांसाठी जवळपास अडीच कोटींचा निधी प्राप्त करून घेतला आहे.आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी शासकीय यंत्रणेला हे काम सोपविण्यात आले आहे. डिसेंबर अखेर हे काम पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षापासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.२१ वसतिगृहातयोजना कार्यान्वितगडचिरोली प्रकल्पाअंतर्गत नाविण्यपूर्ण (टीएसपी) योजनेअंतर्गत सर्वच २१ शासकीय वसतिगृहांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक वसतिगृहाला जवळपास ५० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळत आहे. या योजनेमुळे विद्यार्थी समाधानी आहेत.