शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा जोपासावी

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात काही दिवस एकत्र घालविल्याने विद्यार्थ्यांमध्ये विचार व गुणांचे आदानप्रदान होण्यास

आष्टी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात काही दिवस एकत्र घालविल्याने विद्यार्थ्यांमध्ये विचार व गुणांचे आदानप्रदान होण्यास मदत होते. त्याचबरोबर श्रमदान हा रासेयो शिबिराचा महत्त्वाचा भाग असून श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा जोपासण्याची मानसिकता निर्माण होते. त्यातून सामाजिक भान असणारे विद्यार्थी तयार होतात, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले. आष्टी येथील सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयीन स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष सौरभ मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पेपरमिलचे जनरल मॅनेजर राजीव मेजीरता, डॉ. एस. एम. रोकडे, जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, माजी जि.प. उपाध्यक्ष भगीरथ येलमुले, माजी जि.प. सदस्य प्रभाकर पंदीलवार, सुधाकर मारगोनवार, प्राचार्य डॉ. अपर्णा मारगोनवार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सौरभ मुनघाटे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमदानाचे महत्त्व कळण्यास मदत होते, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान आंतर महाविद्यालयीन जुडो व पॉवरलिफ्टींग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविणाऱ्या चेतन पोतगंटावार, विवेक खोब्रागडे व शुभांगी बावणे यांचा कुलगुरूंच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अपर्णा मारगोनवार, संचालन तृप्ती ढुमणे व सोनू नागपुरे तर आभार प्रा. प्रविण गोहणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी भगवान धोटे, प्रा. संजय मुरकुटे, प्रा. डॉ. पंकज चव्हाण, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. डॉ. प्रदीप कश्यप, प्रा. डॉ. एम. पी. सिंग, प्रा. डॉ. पी. के. सिंग, प्रा. सुचिता पेद्दीवार, प्रा. जया रोकडे, प्रा. रोशना बुरमवार, प्रा. अरविंद निमरड यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)