शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकाअभावी विद्यार्थ्यांना धोका

By admin | Updated: November 17, 2014 22:54 IST

आरमोरी-देसाईगंज या मुख्य मार्गाच्या बाजूलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय असून या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी शाळादर्शक फलक नाही.

देसाईगंज : आरमोरी-देसाईगंज या मुख्य मार्गाच्या बाजूलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय असून या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी शाळादर्शक फलक नाही. त्याचबरोबर गतिरोधकही नसल्याने वाहने सुसाट वेगात जात असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक शहर आहे. या ठिकाणची बाजारपेठ प्रसिद्ध असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक देसाईगंज येथे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी येतात. त्याचबरोबर देसाईगंज येथून अनेक ठिकाणी मार्ग जातात. रेल्वेचे प्रवासीही देसाईगंज येथूनच पुढे मार्गक्रमण करतात. या सर्वबाबींमुळे देसाईगंज शहरात दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू राहते. देसाईगंज-आरमोरी या मुख्य मार्गाच्या अगदी बाजुलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या मार्गावर सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळकरी मुलेही ये-जा करतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या ठिकाणावरून वाहनांची गती कमी करण्यासाठी गतीरोधक तसेच शाळादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. याबाबत नगर परिषद व बांधकाम विभागाकडे शाळा प्रशासनाने अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र अजूनपर्यंत गतीरोधक निर्माण करण्यात आला नाही. त्याचबरोबर फलकही लावण्यात आलेला नाही. महाविद्यालय लक्षात घेऊन दुभाजकामध्ये अंतर ठेवणे आवश्यक होते. मात्र अंतर नसल्याने विद्यार्थ्यांना जवळपास २०० मिटरचा फेरा मारून महाविद्यालयांमध्ये यावे लागते. महाविद्यालयाच्या परिसरातच उच्चभ्रू नागरिकांची वस्ती आहे. त्यांचीही वाहने नेहमीच ये-जा करतात. या ठिकाणी नेहमीच लहान-मोठे अपघात होत असतात. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या इमारतीसमोर गतीरोधक निर्माण करावा व शाळादर्शक फलक लावावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)