लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भुताटकीच्या प्रकरणामुळे सर्व विद्यार्थी गावाकडे परतले. परिणामी सदर आश्रमशाळा ओस पडली. दरम्यान सोमवारी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती कार्यक्रम घेऊन अंधश्रध्दा दूर केली. शिवाय अधिकाºयांनीही पालकांना समज दिली. त्यानंतर मंगळवारी सदर आश्रमशाळेत ४० पेक्षा अधिक विद्यार्थी परतले आहेत.बुधवारी व गुरूवारपर्यंत सर्व विद्यार्थी सदर आश्रमशाळेच्या वसतिगृहात दाखल होणार आहेत. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक जगदिश बद्रे, उद्धव डांगे, आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचलवार, अंनिसचे तालुका संघटक शालिक कराडे, कोटगूलचे सरपंच राजेश नैताम, मुख्याध्यापक भुरे आदी उपस्थित होते. सहायक प्रकल्प अधिकारी राचलवार व अंनिसच्या पदाधिकाºयांनी अंधश्रध्दा दूर घालविण्याबाबत आश्रमशाळेच्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. प्रशासन आपल्या पाठीशी आहे. घाबरण्याचे काही कारण नाही, अशी हिंमत त्यांनी दर्शविली. त्यामुळे विद्यार्थी परतले. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आदिवासी विभागात खळबळ माजली होती.अंधश्रद्धा झाली दूरकोटगूलच्या आश्रमशाळेत भूत-पिशाच्चची अफवा पसरल्यानंतर विद्यार्थी व पालक भयभित झाले. विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घर गाठले. दरम्यान लोकमतमध्ये बातमी झळकताच अंनिसचे पदाधिकारी व प्रकल्पाच्या अधिकाºयांनी कोटगूलची आश्रमशाळा गाठली. त्या ठिकाणी जाऊन पालक व आश्रमशाळा समितीच्या सदस्यांची समजूत घातली.
कोटगूल आश्रमशाळेत विद्यार्थी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:25 IST
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भुताटकीच्या प्रकरणामुळे सर्व विद्यार्थी गावाकडे परतले. परिणामी सदर आश्रमशाळा ओस पडली. दरम्यान सोमवारी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती कार्यक्रम घेऊन अंधश्रध्दा दूर केली.
कोटगूल आश्रमशाळेत विद्यार्थी परतले
ठळक मुद्देभुताटकीचे प्रकरण : अंनिसची जनजागृती व अधिकाऱ्यांकडून पालकांना समज