शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा

By admin | Updated: December 29, 2014 23:44 IST

स्थानिक शासकीय मागास वर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून दर रविवारी चामोर्शी शहरातील मुख्य स्थानांची स्वच्छता केली जात असल्याने आजपर्यंत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरविलेले

चामोर्शी : स्थानिक शासकीय मागास वर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून दर रविवारी चामोर्शी शहरातील मुख्य स्थानांची स्वच्छता केली जात असल्याने आजपर्यंत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरविलेले ही स्थाने आता चकाचक, स्वच्छ व निटनेटके दिसायला लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची गावातील नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे. शासनाने प्रत्येक गावात, वार्डात व शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. त्यानुसार प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र ही स्वच्छता मोहीम अल्पजीवी ठरली. ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली गेली, त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले. हा अनुभव प्रत्येक गावकऱ्यांच्या पाठीशी असताना स्वच्छ भारत अभियान वर्षभर चालविण्याचा निर्धार चामोर्शी येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केला. त्यानुसार वसतिगृहाचे अधीक्षक मनोज वडझरकर व भारतीय विकास गृहाचे कर्मचारी तसेच वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी बसस्थानकाची स्वच्छता करण्याचा उपक्रम मागील एक महिन्यापासून हाती घेतला आहे. सदर विद्यार्थी दर रविवारी सकाळच्या सुमारास बसस्थानक, लक्ष्मी गेट परिसर, महात्मा गांधी बालोद्यान परिसर, वसतिगृहाचा परिसर व मुख्य बसस्थानकाची नियमितपणे साफसफाई करीत आहेत. या सर्व स्थळांवर नागरिकांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे दर दिवशी मोठ्या प्रमाणात कचराही जमा होतो. मात्र विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मोहिमेमुळे हा परिसर आता स्वच्छ व निटनेटके दिसू लागला आहे. या उपक्रमात चामोर्शी वसतिगृहातील विद्यार्थी रूपेश संगम, सचिन वाडके, अर्जुन बंशी, सोहेल गेडाम, पवन धोती, जगदीश भांडेकर, केशव गुंडावार, मारोती गट्टीवार आदी सहभागी झाले आहेत. या उपक्रमाची प्रशंसा होत आहे. (शहर प्रतिनिधी)