शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By admin | Updated: February 28, 2017 00:52 IST

पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले.

पाचवी व आठवीचे विद्यार्थी : चामोर्शी, आरमोरी, आष्टी, अंकिसा केंद्रावर विद्यार्थी प्रविष्टचामोर्शी/आरमोरी/आष्टी/अंकिसा : पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले. चामोर्शी येथे जा. कृ. बोमनवार विद्यालयाच्या केंद्रावर २०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. यावेळी केंद्रप्रमुख व्ही. बी. वन्नेवार, सहायक केंद्रप्रमुख एन. डब्ल्यू. कापगते यांनी परीक्षेचे काम पाहिले. जि. प. केंद्र शाळेच्या केंद्रावर इयत्ता पाचवीचे ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. येथे केंद्रप्रमुख एस. एस. खेवले यांनी काम पाहिले. शिवाजी हायस्कूलच्या केंद्रावर इयत्ता आठवीचे १४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. येथे बी. एच. शिल यांनी केंद्रप्रमुख जबाबदारी पाहिली. यावेळी बैठे पथकात नरेंद्र कोत्तावार, गणेश बोईनवार, भांडेकर यांनी कामगिरी पार पाडली. कृषक हायस्कूलमध्ये ३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. येथे एम. आर. बुराडे यांनी केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. आरमोरी येथे महात्मा गांधी उच्च माध्यमिक शाळा , महात्मा गांधी विद्यालय , डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय , व हितकारिणी विद्यालय व तालुक्यातील दहा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी प्रविष्ट झाले. आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूलच्या केंद्रावर १३९ विद्यार्थ्यांपैकी १३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत केंद्रप्रमुख म्हणून बारसागडे यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य संशोधन मंडळ पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हाभरात शेकडो विद्यार्थी प्रविष्ट झाले. सर्व केंद्रांवर उत्तम व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलच्या केंद्रावर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले. अंकिसा, आसरअल्ली, नडीकुडा येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग दर्शविला. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १०० विद्यार्थी बसणार होते. परंतु २१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ६७ विद्यार्थ्यांपैकी ५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. ९ विद्यार्थी अनुपस्थित होते. केंद्रावर केंद्र संचालक म्हणून डी. ए . कोरेवार, व्ही. एस. पुरकलवार, मुख्याध्यापक एम. टी. वाढई, एम. ए. मेश्राम, टी. व्ही. शेट्टीवार, झोरे, ए. आय. रोकडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)