शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल

By admin | Updated: July 22, 2016 01:24 IST

एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता...

अनेकांना घरी परतावे लागले : शाळेच्या वेळेत बस द्या; पालकांची मागणी एटापल्ली : एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता जारावंडी-एटापल्ली-अहेरी या बसने जात होते. विद्यार्थ्यांनी बससाठी एसटीची पासही काढली होती; मात्र काही दिवसांपासून ही बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करून खासगी वाहनाने जावे लागत आहे. अनेकदा अधिकच उशीर झाल्यास शाळेत न जाता घरी परतावे लागत आहे. खासगी वाहनात प्रवाशी कोंबून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागतो. खासगी वाहनात सर्व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शासकीय कर्मचारीही अहेरी व आलापल्लीच्या कार्यालयात याच बसगाडीने येतात. त्यांच्यातही सध्या नाराजीचा सूर आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून अहेरी-एटापल्ली ही सकाळी ९ वाजताची बसफेरी सुरू करावी, सदर बस १० वाजता एटापल्लीवरून परत जाऊ शकते किंवा बंद झालेली जारावंडी-अहेरी ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी) नागुलवाही परिसरातही बसअभावी पायपीट मुलचेरा : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे सुविधा उपलब्ध होते. मात्र मुलचेरा तालुक्यात नागुलवाही, मच्छीगट्टा, मरपल्ली येथील नागरिकांना एसटी बसअभावी ८ किमीची पायपीट करावी लागत आहे. मुलचेरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या तिन्ही गावातील रस्त्यावर एसटी धावलेली नाही. या गावातील नागरिकांना कोर्ट कचेरीच्या कामासाठी मुलचेरा येथे यावे लागते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लगाम येथे जावे लागते. लगामपासून ८ किमी अंतरावर असलेल्या या गावातील नागरिकांना बससेवेचा लाभ मिळत नसल्याने लगामपर्यंत पायीच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठे हाल होतात. अहेरी आगाराने प्रायोगिक तत्त्वावर अहेरी-लगाम-नागुलवाही ही यशवंती बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)