शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
2
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
3
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
4
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
5
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
6
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
7
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
8
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 
9
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
10
चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
11
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
12
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
13
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
14
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
15
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
16
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
17
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
18
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
19
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
20
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन

आश्रमशाळेचे विद्यार्थी नाश्त्यावरच जातात परीक्षेला

By admin | Updated: March 9, 2017 01:45 IST

इयत्ता दहावी व बारावीची बोर्डाची परीक्षा जिल्हाभरात विविध केंद्रांवर सुरू आहे. मात्र आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालय नाशिक

आदिवासी विकास विभागाचे नवे वेळापत्रक मालेवाडा : इयत्ता दहावी व बारावीची बोर्डाची परीक्षा जिल्हाभरात विविध केंद्रांवर सुरू आहे. मात्र आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या पत्राच्या अनुषंगाने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाची वेळ बदलविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत असलेल्या पेपरला आश्रमशाळेतील विद्यार्थी सकाळी ७.३० ते ८ वाजताच्या नाश्तावरच केंद्रावर पोहोचत आहेत. आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या १२ जानेवारी २०१७ च्या पत्रान्वये सकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रत्येक विद्यार्थ्याला १०० ग्रॅमचा नाश्ता दिला जात आहे. दुपारी १२.४५ ते १.४५ या वेळेत भोजनाची वेळ आहे. इयत्ता दहावी व बारावीचे आश्रमशाळेतील विद्यार्थी सकाळचा नाश्ता करून परीक्षा केंद्रावर पेपर सोडविण्यासाठी पोहोचत आहेत. दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी भोजन करतात. त्यानंतर दुपारी ३.३० ते ४ या वेळेत विद्यार्थ्यांना फळ दिली जातात. रात्रीचे भोजन ७.३० ते ८ या कालावधीत दिले जाते. आदिवासी विकास विभागाच्या या नव्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या तिनही प्रकल्पातील शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची पंचाईत होत आहे. (वार्ताहर)