शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: September 29, 2016 01:40 IST

आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत येरमागड येथील आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर

येरमागड आश्रमशाळा : विद्यार्थी मृत्यू प्रकरणानंतर कौस्तुभ दिवेगावकर यांची भेटगडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत येरमागड येथील आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी अचानक येरमागड आश्रमशाळेला भेट देऊन तेथील व्यवस्थांची पाहणी केली. तसेच आरोग्य शिबिर लावून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या तपासणीदरम्यान चार विद्यार्थ्यांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे आढळून आले. यामध्ये ममीता माधव होळी, अशवंती मधुकर पोरेटी, करिना आनंदराव मडकाम, रूपाली यशवंत कुंभरे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. येरमागड आश्रमशाळेचा विद्यार्थी रजनूू बुतेकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी सोमवारला आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर येथीलच विद्यार्थी अलिराम तुमरेटी याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर पुन्हा आशिक राजेश हिडामी या विद्यार्थ्याला पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागला. येरमागड आश्रमशाळेत आरोग्याची प्रचंड समस्या ऐरणीवर आली असल्याचे पाहून गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येरमागड आश्रमशाळेला भेट दिली.विद्यार्थी आशिक हिडामी याने एकाच दिवशी दीड किलो शेंगदाणे खाल्याने त्याची प्रकृती बिघडली, असे तपासणीत आढळून आले. सदर आश्रमशाळेतील खाद्यपदार्थाचे नमूने तपासणीसाठीही पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी दिवेगावकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश दिवेगावकर यांनी येरमागड आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना यावेळी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)