शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:20 IST

येणाऱ्या काळात गडचिरोली शहरात समाजोपयोगी विविध विकासकामे होणार असून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार, अशी ग्वाही नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांची ग्वाही : पालिकेत नगर विकास दिन कार्यक्रम उत्साहात; वक्तृत्व स्पर्धा व परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येणाऱ्या काळात गडचिरोली शहरात समाजोपयोगी विविध विकासकामे होणार असून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार, अशी ग्वाही नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिली.स्थानिक नगर पालिकेच्या प्रांगणात शुक्रवारी नगर विकास दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी कृष्णा निपाने, वित्त व नियोजन सभापती संजय मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बाल कल्याण सभापती वंदना गेडाम, नगरसेविका निता उंदीरवाडे, लता लाटकर, रितू कोलते, वैष्णवी नैताम, अल्का पोहणकर, माविमच्या जिल्हा समन्वयक अधिकारी कांता मिश्रा, मुकूंद उंदीरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. नगर विकास दिनानिमित्त विविध विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन तसेच परिसंवाद घेण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत जवाहरलाल नेहरू न.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘शालेय विद्यार्थ्यांकडून आपल्या शहराबाबतच्या अपेक्षा व शहर विकास’ असा वक्तृत्व सपर्धेचा विषय होता. यावेळी रचना सहायक जी. टी. मैंद यांनी येणाऱ्या २० वर्षात विविध विकासकामांच्या व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. आर्थिक व्यवहार कॅशलेस करणे याची लोकजागृती व्हावी, यावर लेखापाल महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी कृष्णा निपाने, संचालन गणेश ठाकरे तर आभार गणेश नाईक यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुधाकर भरडकर यांनी सहकार्य केले.महिला बचत गटांना धनादेश वाटपगडचिरोली नगर पालिकेच्या वतीने सदर कार्यक्रमात नगराध्यक्ष पिपरे, उपाध्यक्ष कुनघाडकर यांच्या हस्ते महिला बचत गटांना १० हजार रूपयांचे खेळते भांडवल धनादेशाच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. यातून स्वयंरोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे.