शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा न.पं.वर नागरिकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:55 IST

सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचे तसेच पदाधिकारी व सदस्यांचे सिरोंचा माल व रैयत वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन सिरोंचा मालबाबत दुजाभाव करीत आहे. सिरोंचा माल येथील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी या वॉर्डातील शेकडो नागरिकांनी सिरोंचा नगर पंचायतीवर धडक दिली .....

ठळक मुद्देपाण्यासाठी संतापले लोक : दुजाभाव होत असल्याचा सिरोंचामालवासीयांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचे तसेच पदाधिकारी व सदस्यांचे सिरोंचा माल व रैयत वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन सिरोंचा मालबाबत दुजाभाव करीत आहे. सिरोंचा माल येथील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी या वॉर्डातील शेकडो नागरिकांनी सिरोंचा नगर पंचायतीवर धडक दिली व मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना सादर केले.सिरोंचा माल येथे मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी महिलांना पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी पुरवठ्याची समस्या वेळोवेळी तयार होत असल्याने महिला त्रस्त आहेत. पाणी पुरवठा लवकरच सुरू करावा. सिरोंचा माल येथे साफसफाईकडे दुर्लक्ष झाले आहे. नाल्यांचा उपसा सुध्दा करण्यात आला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. नाली उपसा न करताच लाखो रूपयांच्या देयकांची उचल झाली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट न लावता अनावश्यक ठिकाणी हायमास्ट लावले आहेत. सिरोंचा माल येथे सर्व रस्ते कच्चे आहेत. पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल निर्माण होते. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवावे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये धर्मराव वसतिगृह आहे. या ठिकाणी डासाचे प्रमाण अधिक असल्याने सदर वसतिगृह दुसऱ्या ठिकाणी हलवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक नरेश अलोणे, रवी रालबंडीवार, मुमताज बेगम हुसेन खान, बबलू पाशा, जगदिश रालबंडीवार, सय्यद सलाम, सिध्दीक अली, याकुबबाबा, नरसिंग सीलवेरी, आसिफ खान यांनी केले.कोत्तागुडम गावातून निघालेला मोर्चा पोलीस स्टेशन मार्गे नगर पंचायतीवर धडकला. नगर पंचायतचे सहायक प्रभारी लेखापाल एम. एस. पेंदाम, नगर अभियंता ए. ए. खान यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष अनुपस्थित होते. मोर्चेकºयांनी नगर पंचायतीविरोधात घोषणा दिल्या. पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत ठेवावी, अशी मागणी केली. नगर पंचायतवरून मोर्चा बसस्थानक, राजीव चौक मार्गे तहसील कार्यालयावर गेला. नायब तहसीलदार राहूल वाघ व गोर्धन गागापुरपु यांना निवेदन दिले. २४ तासात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास नगर पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली