शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:36 IST

‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देघोषणांनी दुमदुमला आसमंत : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, धानाला प्रती क्विंटल ४ हजार ५००, कापसाला १० हजार, सोयाबिनला आठ हजार रूपये प्रमाणे भाव द्यावा, वनसंवर्धन कायद्यामुळे रखडलेले तुलतुली, कारवाफा, चेन्ना, पिपरी रिठ, डुरकानगुड्रा, कळमगाव आदी सिंचन प्रकल्पांना मंजुरी देऊन काम करावे, गरीब, शेतकरी, शेतमजूर यांना काँग्रेस सरकारच्या काळाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून अन्न, धान्य, साखर, रॉकेल, डाळीचा पुरवठा करावा, संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन वाढवून दोन हजार रूपये करावे, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा १० हजार रूपये बेरोजगार भत्ता द्यावा, एमपीएससी, युपीएससीची रिक्त पदे त्वरीत जाहीर करावी, सुशिक्षीत बेरोजगारांचे सर्वेक्षण करावे, लोखंड कारखाना स्थापन करून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार द्यावा, रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, ५० टक्के ओपनच्या जागा भरताना गुणवत्ताप्राप्त मागस प्रवर्गातील उमेदवारांना संधी द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार नाना पटोले, मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रसचे निरिक्षक सुरेश भोयर, प्रतिभा रघुवंशी, माजी आमदार आनंदराव गेडाम, अविनाश वारजुरकर, पंकज गुड्डेवार, सहसराम पोरेटे, एन. टी. किरसान, सतीश वारजुरकर, हसनअली गिलानी, रवींद्र दरेकर, प्रकाश इटनकर, जीया पटेल, नितीन कुंभलकर, प्रफुल्ल गुडघे, नरेंद्र जिचकार, संजय चरडुके, प्रमोद भगत, रवींद्र शहा, निशांत नैताम, वैभव भिवापुरे, दीपक ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, रूपाली पंदिलवार, वैशाली ताटपल्लीवार, कविता भगत, मनोहर पोरेटी, बंडू शनिवारे, विश्वजित कोवासे, जेसा मोटवानी, नरेंद्र गजपुरे, नेताजी गावतुरे, नगरसेवक सतीश विधाते, अमोल भडांगे, निलेश राठोड, शंकरराव सालोटकर, किशोर चापले, सुदाम मोटवानी, अर्पणा खेवले, ढोक, जयंत हरडे, जीवन नाट, परसराम टिकले, पी. आर. आकरे, तौफीख शेख, गौरव आलाम, रजनिकांत मोटघरे यांनी केले.मोर्चाचे आयोजन गडचिरोली-चिमूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.युवक काँगे्रसच्या नेतृत्वामुळे आंदोलनात दिसले एकीचे बळकाँग्रेस पदाधिकाºयांमध्ये बºयाच वेळा एखाद्या आंदोलनावरून मतभेद निर्माण होतात. एका गटाचे आंदोलन असेल तर दुसºया गटाचे पदाधिकारी सहभागी होत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र युवक काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वात सोमवारी काढलेल्या मोर्चात जिल्हाभरातील वरिष्ठ फळीतले सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी मतभेद विसरून सहभागी झाले होते. एवढेच नाही तर जिल्हा परिषद सदस्य, पं.स. सभापती, माजी जि.प.उपाध्यक्ष यांनी सुध्दा कार्यकर्त्यांसह आंदोलनात हजेरी लावली होती. त्यामुळे आंदोलनात काँग्रेसचे एकीचे बळ दिसले.१ वाजता इंदिरा गांधी चौकातून बैलबंडी मोर्चा निघाला. माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, निरिक्षक सुरेश भोयर यांच्यासह वरिष्ठ फळीतील पदाधिकारी बैलबंडीवर स्वार झाले होते. कडक ऊन असल्याने घामाच्या धारा वाहत असतानाही इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे सुमारे तीन किमीचे अंतर कार्यकर्त्यांनी पायदळ तर पदाधिकाºयांनी बैलबंडीवर गाठले. बैलबंडी, हजारो कार्यकर्ते यामुळे काही काळ गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.