शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

उभ्या ट्रकला ट्रकची मागून धडक

By admin | Updated: July 8, 2015 01:58 IST

ट्रकच्या प्रेशर पाईपची दुरूस्ती सुरू असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने दोघेजण गंभीर ....

दोन गंभीर जखमी : आरमोरी मार्गावरील मोहझरीनजीकची घटनागडचिरोली : ट्रकच्या प्रेशर पाईपची दुरूस्ती सुरू असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली-आरमोरी मार्गावर पोर्ला गावाजवळील मोहझरी जवळ मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. दिलीप ताडाम व लक्ष्मण ताडाम हे दोघेजण या अपघातात जखमी झाले. आरमोरीवरून येणाऱ्या सीजी ०९ एल २९१४ या ट्रकचे अचानक प्रेशर पाईप फुटले. दरम्यान सदर ट्रक व मागे असलेल्या सहकाऱ्याचा ट्रक रस्त्याच्या कडेला लावून प्रेशर पाईपची दुरूस्ती सुरू होती. दरम्यान एमएच ४० वाय ३१३३ क्रमांकाचा ट्रेलर कंपनीचा ट्रक मागून रस्त्यावरील ट्रकला जबर धडक दिली. यात दिलीप ताडाम व लक्ष्मण ताडाम यांच्या पायावर चाक गेल्याने त्यांना प्रचंड दुखापत झाली. ट्रक क्षतिग्रस्त झाल्याने रस्त्यावर उभे असलेल्या या दोन्ही ट्रकचे जवळपास १६ लाख रूपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही जखमी ट्रकचालकांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. घटनेचा पंचनामा केला. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आरोपी ट्रकचालक फरार झाला. पोलिसांनी एमएच ४० वाय ३१३३ या अज्ञात ट्रक चालकावर भादंविचे कलम २७९, ३३८, ४२७, १८४, १३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)