शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

औषध निर्माण अधिकाऱ्यांवर ताण; पी फाॅर्म भरण्याची सक्ती मागे घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदींना वैद्यकीय अधीक्षकांकडून औषध निर्माण अधिकाऱ्यांना आय.एच.आय.पी. मधील पी फाॅर्म भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आधीच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा व अतिरिक्त कामांमुळेही सक्तीची दिली जाणारी जबाबदारी अन्यायपूर्ण आहे.  पी फाॅर्ममध्ये दाखल रुग्णांचा तपशील, डेथ रेकाॅर्ड, रेकाॅर्ड ॲग्रिमेंट डाटा असे ३ प्रकारचे फाॅर्म भरायचे आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : केंद्र शासनाच्या आराेग्य विभागाच्या संकेतस्थळावर पी फाॅर्म भरण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे, असे स्पष्ट नमूद आहे. तशा मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतानाही औषधी निर्माण अधिकाऱ्यांनी सदर फाॅर्म भरावा, अशी सूचनावजा सक्ती करणे ही बाब याेग्य नाही. हे काम लवकर थांबवावे, असे पत्र शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटनेने राज्य शासनाचे आराेग्य संचालक व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सादर केेले आहे.जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदींना वैद्यकीय अधीक्षकांकडून औषध निर्माण अधिकाऱ्यांना आय.एच.आय.पी. मधील पी फाॅर्म भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आधीच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा व अतिरिक्त कामांमुळेही सक्तीची दिली जाणारी जबाबदारी अन्यायपूर्ण आहे.  पी फाॅर्ममध्ये दाखल रुग्णांचा तपशील, डेथ रेकाॅर्ड, रेकाॅर्ड ॲग्रिमेंट डाटा असे ३ प्रकारचे फाॅर्म भरायचे आहेत. साेबत रुग्णांचे नाव, माेबाईल क्रमांक, जन्म तारीख, जन्मखूण, पत्ता, ओळखपत्राचा नंबर, राेगनिदान प्रयाेगशाळेच्या तपासण्या अशी बरीच माहिती ऑनलाईन/ऑफलाईन भरायची आहे.औषधी निर्माण अधिकाऱ्यांना रुग्णाच्या आजाराचे निदान किंवा उपचाराचे कुठलेही ज्ञान नसतानाही आयएचआयपी मधील पी फाॅर्म भरण्याची सक्ती करण्याचे प्रयाेजन काय? असा प्रश्न संघटनेने उपस्थित केेला आहे. पी फाॅर्म मध्ये एकूण ३३ आजारांची अचूक माहिती भरायची असलयाने हा फाॅर्म वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे भरला जाणे गरजेचे आहे. दैनिक कामे सांभाळून पी फाॅर्म भरण्यासाठी अतिरिक्त वेळ काढणे अशक्य आहे. त्यामुळे सदर जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी औषध निर्माण अधिकारी गट ‘क’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश देशमुख, सचिव राकेश गरपल्लीवार यांनी आराेग्य सेवा संचालक पुणे, उपसंचालक आराेग्य सेवा नागपूर, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिराेली, जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरराेज अतिरिक्त १५ तास लागणार-    पी फाॅर्म भरताना आराेग्य पर्यवेक्षक किंवा आराेग्य सहायक यांनी पी फाॅर्म भरण्यासाठी औषध निर्माण अधिकारी यांना मदत करायची आहे; परंतु आराेग्य पर्यवेक्षक किंवा आराेग्य सहाय यांची पदे रिक्त आहेत किंवा कार्यरत नाहीत. एका रुग्णाची पी फाॅर्ममध्ये ऑनलाईन/ऑफलाईन माहिती भरण्यासाठी साधारणत: ३ मिनिटे लागतात. जिल्हा रुग्णालय व अधिनस्त महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात दरराेज सरासरीने ३०० ते ५०० रुग्ण उपचार घेतात. या सर्वांची माहिती भरण्यासाठी १४ ते १५ तास लागतात.

अनेक रुग्णालयातील पदे रिक्त; नवीन जबाबदारी कशी पेलणार? औषध निर्माण अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील रुग्णालयांना मागणीनुसार औषधींचे वाटप, औषधी व्यवस्थापन, औषधांच्या जमाखर्चाची नाेंद, मुदतबाह्य औषधांची नाेंद ऑक्सिजन सिलिंडरचा वेळेवर पुरवठा, शिल्लक साठ्याची नाेंद, आदी कामे करावी लागतात. याशिवाय ग्रामीण रुग्णालय आष्टी, धानाेरा व सिराेंचा येथे औषध निर्माण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त व्याप वाढलेला असताना ही अतिरिक्त नवीन जबाबदारी कशी पेलणार, असा सवाल संघटनेने केला आहे.

 

टॅग्स :medicineऔषधं