शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गावातच वाद मिटवून पदाचे स्थान बळकट करा

By admin | Updated: January 22, 2017 01:39 IST

महसुली व दंडाधिकारी प्रकरणात तसेच कायदा व सुव्यवस्थेतही पोलीस पाटलांचे मोठे सहकार्य लाभते.

पोलीस पाटील दिन समारंभ : कौस्तुभ दिवेगावकर यांचे पोलीस पाटलांना आवाहन गडचिरोली : महसुली व दंडाधिकारी प्रकरणात तसेच कायदा व सुव्यवस्थेतही पोलीस पाटलांचे मोठे सहकार्य लाभते. पोलीस पाटील हा गावाचा आरसा आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी गावातील तंटे गावातच मिटवावे. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आचारसंहितेचे पालन व कायदा तसेच शांतता ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रशासनाला सहकार्य करून पोलीस पाटलाचे स्थान बळकट करावे, असे आवाहन गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील तालुका संघटना गडचिरोलीच्या वतीने शनिवारी स्थानिक पोलीस ठाण्यात आयोजित पोलीस पाटील दिन समारंभ तथा सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरिक्षक सत्यवान भूयारकर, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष हरिहर खरकाटे, आरमोरी तालुकाध्यक्ष नरेंद्र बनपुरकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष अनिल कुकुडकार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, पोलीस पाटील हे शासनाचे प्रतिनिधी आहेत. आगामी जि.प. व पं.स. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी पोलीस पाटलांनी फोन, ईमेल व मॅसेजद्वारे माहिती द्यावी, संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल. निवडणुकीत कोणालाही दारूचे वाटप करू देऊ नका, एसडीओ कार्यालयाशी सतत संपर्क ठेवा, असे आवाहन दिवेगावकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी ठाणेदार विजय पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गडचिरोली, धानोरा, चामोर्शी तालुक्यातील पोलीस पाटील हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी) मंडळ अधिकारी कार्यालयात निवासासाठी व्यवस्था करणार सन १९९२ पासून पोलीस पाटील भवनासाठी प्रशासनाकडून जागा मिळत नसल्याची बाब पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे यांनी लक्षात आणून दिली. यावर उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांनी पोलीस पाटील भवनासाठी जागा मागणी बाबतच्या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांना कामानिमित्त गडचिरोलीत राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीत एक स्वतंत्र खोली देणार, अशी ग्वाही दिवेगावकर यांनी यावेळी दिली. ४याशिवाय सर्व पोलीस पाटलांना ओळखपत्र महिनाभरात देण्यात येईल. तसेच गडचिरोली उपविभागाच्या धानोरा व गडचिरोली तालुक्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती दिवेगावकर यांनी यावेळी केली. सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील रमेश देशमुख यांचा एसडीओ दिवेगावकर व ठाणेदार पुराणिक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व साडीचोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.