शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:28 IST

विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी ......

ठळक मुद्देभाजप उमेदवार रामदास आंबटकर : गडचिरोली दौऱ्यानंतर व्यक्त केला विजयाचा आत्मविश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचा मनोदय शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. भाजपच्या मतदारांचे प्राबल्य असले तरीही कोणत्याही लढाईत शत्रुला कमी लेखू नये, म्हणून ही निवडणूक आपण गांभिर्याने लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले विद्यमान आमदार भाजपचेच आहे, पण त्यांनी गेल्या सहा वर्षात गडचिरोलीकरांची चांगलीच निराशा केली. असे असताना मतदार तुम्हाला स्वीकारतील का? असा प्रश्न केला असता गडचिरोली माझ्यासाठी नवीन नसून येथील विविध प्रश्नांची मला माहिती आहे. त्यामुळे गडचिरोलीकडे विशेष लक्ष राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषत: नवीन नगर पंचायतींचा कारभार कसा चालवावा याचे प्रशिक्षण, तसेच अधिकारांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.यावेळी खासदार अशोक नेते यांनी डॉ.आंबटकर यांच्या विजयाची पूर्ण खात्री दिली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत आणण्यासाठी रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी म्हणून आंबटकर यांनी कसे योगदान दिले याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री रवी ओललवार, डॉ.भारत खटी, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या निवडणुकीसाठी पक्षीय मतदारांचे संख्याबळ पाहता भाजपचे प्राबल्य असले तरी जास्त रिस्क न घेता तळ्यात-मळ्यात करणाºया काही मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही भाजपाकडून सुरू आहे.भाजपचे मतदार जाणार सहलीलाया निवडणुकीत जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायतचे सदस्य असलेले अनेक मतदार उमेदवारांकडून मलिदा मिळण्याची आस लावून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भाजपची यंत्रणा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र तरीही अनेक लोकांनी मतदानाच्या दिवसापर्यंत सहलीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते भाजपशासित एखाद्या राज्यात सहलीसाठी निघणार आहेत. त्यांची चांगली व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित राज्याच्या सत्ताधारी पदाधिकाºयांकडे दिली जाणार असल्याचे समजते.