शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

जंकासचे बळकटीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:16 IST

आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थांच्या सभासदांना जास्तीत जास्त रोजगार मिळून संस्थांना ऊर्जितावस्था

सभासदांना साहित्य वितरण : अधिदान कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षकांचे प्रतिपादन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थांच्या सभासदांना जास्तीत जास्त रोजगार मिळून संस्थांना ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी वनविभागाच्या वतीने सकारात्मक धोरण राबविल्या जाईल असे प्रतिपादन गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डब्लू. एस. एटबॉन यांनी केले. जंगल कामगार सहकारी संस्था जांभळी, महावाडा, सालेभट्टी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जुलै रोजी पोटेगांव मार्गावरील गोंडवाना कला दालनमध्ये १० टक्के समाजकल्याण अधिदान वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख वितरक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे अध्यक्ष माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख वितरक म्हणून गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक फुले, प्रमुख अतिथी म्हणून राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे उपाध्यक्ष माजी आ. हरिराम वरखडे, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, सहाय्यक वनसंरक्षक ए. आर. पऱ्हाड, सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक नितीन म्हस्के, महावाडा संस्थेचे अध्यक्ष नागोराव गावळे, उपाध्यक्ष सुकराम उसेंडी, जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे सचिव एम. डी. मेश्राम, जांभळी संस्थेचे अध्यक्ष शालीकराव कुमरे, उपाध्यक्ष हरीदास नैताम, सालेभट्टी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण जाळे, उपाध्यक्ष अंबरशाह सिडाम व पदाधिकारी उपस्थित होते. माजी खा. मारोतराव कोवासे म्हणाले, जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्थांच्या वतीने १० टक्के समाजकल्याण अधिदान रकमेतून संस्थांच्या कार्यक्षेत्रातील एका गावामध्ये वाचनालयाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. १० टक्के समाजकल्याण अधिदान निधीतून सभासदांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. माजी आ. हरिराम वरखडे यांनी सस्थांच्या माध्यमातून विविध व्यवसायाला चालना देण्याची गरज असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते सभासदांना विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक महावाडा संस्थेचे सचिव डी. डी. मेश्राम, संचालन अनखोडा संस्थेचे सचिव ढोरे तर आभार जांभळी संस्थेचे सचिव प्रकाश झाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र वाल्को, रमेश उसेंडी, पोहाणे, गुरूदेव आंदे, पिपरे, नेवारे, हलामी, अ. न. काळबांधे, सुरपाम, सराटे, कालिदास हलामी यांच्यासह जांभळी, महावाडा, सालेभट्टी संस्थांचे संचालक मंडळ व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.