शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अजब फंडा ! बैलबंड्यांद्वारे हाेतेय रेती तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

रेती घाटांवर अडीच ते चार फुटांपर्यंत रुंद नाल्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरने रेतीतस्करीला आळा बसल्याचे चित्र आहे. मात्र, आमगाव येथील बैलबंडीधारकांनी यावर क्लृप्ती काढत, जो रेतीघाट बंद आहे ते सोडून त्यांनी आमगाव येथील अंत्यसंस्कार विधी पार पडतात, त्या घाटाची निवड करीत, तेथून रेती सिमेंट पिशव्यात भरून त्यांची विक्री देसाईगंज शहरात करत असल्याचे चित्र आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : रेती तस्करी थांबविण्यासाठी महसूल विभागाने वैनगंगा नदीवरील काेंढाळा, कुरुड, आमगाव, सावंगी या घाटांवर जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खाेदल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती तस्करीला आळा बसला आहे. मात्र,  आता बैलबंडीधारकांनी रेती चाेरी करण्यास सुरुवात केली आहे.  रेती घाटांवर अडीच ते चार फुटांपर्यंत रुंद नाल्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरने रेतीतस्करीला आळा बसल्याचे चित्र आहे. मात्र, आमगाव येथील बैलबंडीधारकांनी यावर क्लृप्ती काढत, जो रेतीघाट बंद आहे ते सोडून त्यांनी आमगाव येथील अंत्यसंस्कार विधी पार पडतात, त्या घाटाची निवड करीत, तेथून रेती सिमेंट पिशव्यात भरून त्यांची विक्री देसाईगंज शहरात करत असल्याचे चित्र आहे. आमगावातील बऱ्याच लोकांनी या कामासाठी बैलजोड्या विकत घेऊन रेतीची चाेरी करीत आहेत.  बैलबंडीधारक पहाटेला देसाईगंज या शहरात रेती टाकण्यासाठी मार्गस्थ होतात. आमगाववरून हनुमान वार्डात मागील रस्त्याने शहरात प्रवेश करतात. सांगितलेल्या ठिकाणी रेती रिकामी करतात. रेतीला व्यवसायाचे स्वरूप दिलेल्या एका बैलगाडीमधील रेती हजार ते बाराशे रुपयांना विकली जात आहे. शहरात या बैलगाड्या अतिसकाळच्या वेळेस व संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास या शहरात येतात. याप्रमाणे दिवसाला दोन खेपा मारतात. त्यापोटी दोन ते अडीच हजार रुपये पदरी पाडून घेत आहेत. मात्र, या बाबीकडे महसूल विभाग सहजतेने बघत असले, तरी याही माध्यमातून बऱ्याच प्रमाणात रेती तस्करी हाेत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी