शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला वादळ, अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST

गडचिराेली : शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन हाेते. त्यामुळे सायंकाळी पाऊस येईल अशी अपेक्षा नसताना रात्री आठ वाजता वातावरणात अचानक ...

गडचिराेली : शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन हाेते. त्यामुळे सायंकाळी पाऊस येईल अशी अपेक्षा नसताना रात्री आठ वाजता वातावरणात अचानक बदल झाला. साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. गडचिराेली तालुक्यालाही अवकाळी पावसाने झाेडपून काढले. वादळामुळे अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. गडचिराेली शहरासह ग्रामीण भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. अडपल्ली-गाेगाव परिसरातील वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला हाेता.

मुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा या गावातील ४० घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. कोंडा बोमा गरतुलवार, दिवाकर गंगाराम कोसनवार, तुळशीराम लिंगा आरके यांच्या घरांवरील कौले व टिनाचे छत उडून गेले आहे. काही गावांमध्ये गारपीटही झाली. गारांच्या तडाख्यामुळे शेकडाे पक्षी मरण पावले.

तुळशी, काेरेगाव, चाेप : देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, झरी, फरी, उसेगाव, शिवराजपूर, चोप, कोरेगाव, शंकरपूर, बोळधा या गावांसह देसाईगंज तालुक्यातील इतरही गावांमधील उन्हाळी धान पिकाला गारपिटीने झोडपले. जवळपास एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खोलगट व नाल्याशेजारील जमिनीत व धान पिकात पाणी साचले. धानाचा निसवा १०० टक्के होऊन धान पीक कापणी योग्य झाले होते. दि. १ मे रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी जोरदार पावसाने उभ्या धान पिकाला चांगलेच झोडपले. धान पिकाचे ५० टक्के नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त होऊन आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शनिवारी झालेल्या गारपिटीने धान पीकासोबतच आंब्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस सुरू होता. हरभऱ्याच्या आकाराएवढ्या व त्यापेक्षाही मोठ्या गारा पडल्याने लोंबाचे धान गळून पडले.

बाॅक्स

आमदारांनी केली पाहणी

आरमाेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजवे यांंनी चाेप, काेरेगावसह ज्या भागात गारपीट झाली, त्या गावातील शेतांना भेटी दिल्या. धान पिकाची पाहणी केली. नुकसान झालेल्या बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार गजबे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.