शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:59 IST

कोरची तालुक्याच्या बेडगाववासीयांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून कुरखेडा-कोरची मार्गावरील झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.

ठळक मुद्देबेडगाववासीय आक्रमक : कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्याच्या बेडगाववासीयांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून कुरखेडा-कोरची मार्गावरील झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.बेडगाव ग्रामपंचायतीमध्ये स्थायी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, बेडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, बेडगाव येथील वनविभागाचे कार्यालय व निवासस्थानाच्या जीर्ण इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, आदी मागण्यांसाठी बेडगाववासीयांनी रास्तारोको आंदोलन केले. विशेष म्हणजे बेडगाववासीयांच्या वतीने या मागण्यांसंदर्भात तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाºयांकडे अनेकदा निवेदन देण्यात आले होते. मात्र निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. मागण्या निकाली काढण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बेडगाववासीयांनी अखेर गुरूवारी झनकारगोंदी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत कोरचीचे नायब तहसीलदार नारनवरे, बेडगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक ढेकणे, पंचायत विस्तार अधिकारी फाये, राजस्व निरीक्षक पेंदाम यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. येथे आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी मागण्या निकाली काढण्याबाबतचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. दरम्यान तब्बल पाच तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सदर रास्तारोको आंदोलनादरम्यान कुरखेडा-कोरची या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. आंतरराज्यीय वाहतूक करणाºया ट्रकांची दोन्ही बाजूला लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. याशिवाय प्रवाशी वाहनेही थांबली होती.

टॅग्स :Strikeसंप