शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित आश्रमशाळा बंद करणार

By admin | Updated: August 6, 2015 02:12 IST

आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच भाजप-सेना युतीचे सरकार गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व खासगी अनुदानित ...

संस्था चालकांचा आरोप : शासकीय व खासगी आश्रमशाळेत दुजाभावगडचिरोली : आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच भाजप-सेना युतीचे सरकार गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व खासगी अनुदानित आश्रमशाळांच्या अुनदान वितरणाच्या पद्धतीमध्ये दुजाभाव करीत आहे. अनुदानित आश्रमशाळांच्या समस्या हिवाळी अधिवेशनापर्यंत मार्गी न लागल्यास गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ७० खासगी अनुदानीत आश्रमशाळा बंद करणार, असा इशारा अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या संस्थाचालकांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माहिती देताना माजी आमदार तथा आश्रमशाळा संस्थाचालक डॉ. रामकृष्ण मडावी म्हणाले, आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थांना आश्रमशाळेतून प्रत्येक विद्यार्थ्यामागे प्रति महिना ९०० रूपयांचे अनुदान शासन देत आहे. वाढत्या महागाईत विद्यार्थ्यांचे भोजन, नास्ता तसेच इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी ९०० रूपये पुरत नाही. विद्यार्थी अनुदानात वाढ करण्यात यावी, इमारत भाडे देण्यात यावे, सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता द्यावी, आदींसह विविध मागण्यांसंदर्भात शासन व प्रशासन स्तरावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र सरकारचे अनुदानीत आश्रमशाळांकडे दुर्लक्ष आहे, असे मडावी म्हणाले. यावेळी संस्थाचालक अनिल म्हशाखेत्री, शेखर टोंगू, जहीर हकीम, एन. जी. पापडकर, श्रीनिवास गणमुकूलवार, राजेश वाडीघरे उपस्थित होते.