शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या व्हॅनने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:35 IST

देसाईगंज ते कुरखेडा मार्गावरील गुरनोली फाट्यानजीक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका व्हॅनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटने व्हॅनने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालक व इतर चार जणांनी लगेच वाहनातून बाहेर धाव घेतल्याने जीवित हाणी टळली.

ठळक मुद्देपाच जण बचावले : साहित्यासह वाहन खाक

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : देसाईगंज ते कुरखेडा मार्गावरील गुरनोली फाट्यानजीक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका व्हॅनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटने व्हॅनने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालक व इतर चार जणांनी लगेच वाहनातून बाहेर धाव घेतल्याने जीवित हाणी टळली. मात्र यात सदर वाहनासह त्यातील ६३ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.देसाईगंज येथील व्यावसायिक कैलाश आडकिने, विशाल आडकिने, मकसूद याकूब दलाल व शंकरपूर येथील हंसराज जगने यांच्यासह चालक प्रकाश बोरकर हे सर्व आज सकाळी व्हॅन क्र मांक एमएच २०, यु १४९५ या वाहनाने दुकानाचे साहित्य घेऊन छत्तीसगड राज्यातील कुंभकोट येथील मंडईत दुकान थाटण्यासाठी जात होते. मात्र रस्त्यात गुरनोली फाट्यानजीक त्यांच्या वाहनाने अचानक पेट घेतला.गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबविली आणि सर्वजण पटकन वाहनातून बाहेर आले. आग विझविण्यासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे ते वाहन काही वेळातच पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात वाहनातील दुकानचे ६३ हजारांचे साहित्यही जळाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.या घटनेनंतर देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. वाहनाच्या पेट्रोल टाकीचा स्फोट तर होणार नाही या भितीने कोणतेही वाहन तेथून जाण्यास धजावत नव्हते. जळणाऱ्या गाडीच्या दोन्ही बाजुने बघ्यांची गर्दी जमली होती.

टॅग्स :fireआग