शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या रेतीने एटापल्ली तालुक्यात बांधकामे जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:57 IST

संपूर्ण एटापल्ली तालुक्यात एकही रेतीघाटाचा अधिकृतरित्या लिलाव झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या जी बांधकामे सुरू आहेत, ती बांधकामे चोरीच्या रेतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा चुना । शासकीय कामांमध्येही चोरीच्याच रेतीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : संपूर्ण एटापल्ली तालुक्यात एकही रेतीघाटाचा अधिकृतरित्या लिलाव झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या जी बांधकामे सुरू आहेत, ती बांधकामे चोरीच्या रेतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.एटापल्ली तालुक्यात १९२ गावे आहेत. या तालुक्यातून बांडे ही मुख्य नदी वाहते. तसेच लहान-मोठ्या अनेक नद्या व नाले आहेत. या सर्वच नदी, नाल्यांमध्ये उत्कृष्ट दर्जाची रेती आहे. मात्र हा सर्व क्षेत्र जंगलाने व्यापला असल्याने सदर क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित येते. परिणामी या नदी, नाल्यांमधील रेतीचा लिलाव होत नाही. सर्वात मोठी नदी असलेल्या बांडे नदीचा सुद्धा मागील पाच वर्षांपासून लिलाव झाला नाही. परिणामी रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. आलदंडी गावाजवळून रेतीची खुलेआम तस्करी केली जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. एटापल्ली तालुक्यात सुरू असलेली शासकीय कामे सुद्धा चोरीच्या रेतीने सुरू आहेत. कंत्राटदार नेमक्या कुठल्या टीपी बिलाला जोडतात, हे एक न उलगडणारे कोडे बनले आहे.

टॅग्स :sandवाळू