शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

जिल्हाभरातील सट्टाबाजार हादरला

By admin | Updated: April 11, 2015 01:20 IST

१० एप्रिलच्या लोकमतमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अवैध सट्टा व्यवसायाबाबत स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित

दुकाने झाले बंद : एजंट झाले गायब; देसाईगंज, कुरखेडा, अहेरीत मोठी खळबळगडचिरोली : १० एप्रिलच्या लोकमतमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अवैध सट्टा व्यवसायाबाबत स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांशी सट्टाबाजार शुक्रवारी बंद राहिले.देसाईगंज शहरातील तिन्ही सट्टाकेंद्र दिवसभर बंद होते. पोलिसांनी या सट्टा केंद्रांवर कडक नजर ठेवली होती. कुरखेडा शहरातही लोकमतमध्ये छायाचित्र प्रकाशित झालेले सट्टा केंद्र दिवसभर बंद होते. वैरागड व परिसरातील संपूर्ण सट्टाबाजार शुक्रवारी बंदच राहिला. दरम्यान दारू पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक शुक्रवारी कुरखेडा भागात दौऱ्यावर असल्याने त्यांनी दारूसोबतच सट्टा बाजार चालविणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती आहे. अहेरीतही तीन ते चार परवानाप्राप्त आॅनलाईन सट्टा केंद्र सूचना देऊन बंद केले. तुमच्या जवळचे कागदपत्र आणून दाखविल्याशिवाय सट्ट्याचे दुकान उघडायचे नाही, अशी सूचना अहेरी पोलिसांनी या व्यावसायिकांना केली असल्याची माहिती आहे. दरम्यान लोकमतमध्ये वृत्त झळकल्यावर अहेरीतील सट्टा व्यावसायिकांनी लोकमत प्रतिनिधीला आमचा व्यवसाय परवानाप्राप्त आहे. तुम्ही बातमी दिली कशी? अशी विचारणा केली. मात्र सट्ट्यामुळे अहेरीसह जिल्हाभर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक व वकील मंडळींनी लोकमतने केलेल्या या स्टिंग आॅपरेशनचे कौतुक केले आहे. ‘लोकमत’ने एका सामाजिक जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाला हात घातला, याबद्दल अनेकांनी लोकमतचे जाहीर कौतुक केले. शुक्रवारी दिवसभर कौतुकाच्या दूरध्वनीचा वर्षात लोकमत प्रतिनिधींवर होत होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)