शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भरती प्रक्रियेवरील स्थगिती कायमच

By admin | Updated: January 11, 2015 22:50 IST

कुपोषणाची समस्या तीव्र असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

गडचिरोली : कुपोषणाची समस्या तीव्र असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी गडचिरोलीसह अन्य १९ जिल्ह्यात करण्यात आली. सदर भरती प्रक्रियेदरम्यान औरंगाबाद येथील एका इसमाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले. त्यानंतर या भरती प्रक्रियेला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. तीन महिने होऊनही न्यायालयाने या संदर्भात कुठलाही निर्णय न दिल्याने भरतीवरील स्थगिती कायमच आहे.बालमनावर संस्कार करण्यासोबतच बालकांच्या आरोग्याची निगा राखत सकस आहाराचा पुरवठा करणाऱ्या अंगणवाडी केंद्रात एकच शिक्षीका (अंगणवाडी सेविकाची) नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे एकाच अंगणवाडी सेविकांवर विविध बैठकांसह बालकांना पुर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. यामुळे कार्यरत एकच सेविकेवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आले. अतिरिक्त कामामुळे कुपोषणाच्या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देणे शक्य होत नसल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्य शासनाने कुपोषणाची समस्या तीव्र असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यात अतिरिक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली. या प्रक्रियेची गडचिरोली जिल्ह्यातही अंमलबजावणी सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ७७१ अंगणवाडी केंद्र आहेत. प्रत्येकी एक या प्रमाणे १ हजार ७७१ अतिरिक्त अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे जाहिरात प्रकाशित करून इच्छुक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. २५ आॅगस्ट २०१४ पर्यंत जिल्ह्यातील हजारो इच्छुक महिलांनी अतिरिक्त अंगणवाडी सेविका पदासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केले. त्यानंतरची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू होणार होती. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर अतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या पदभरतीला न्यायालयीन स्थगिती मिळाले असल्याचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. नव्या अंगणवाडी सेविका पदभरतीत पदवी शिक्षणाला प्राधान्य व अधिक गुण देण्यात आल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली होती. (स्थानिक प्रतिनिधी)