शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जिल्ह्याला ३५ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:37 IST

महाराष्ट्र कराटे अससोसिएशन संलग्नित महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन व आॅल इंडिया कराटे डो फेडेरेशन तर्फे ४० वी महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा नुकताच मुंबईमधील धारावी येथील क्रीडा संकुल मध्ये पार पडली. या स्पर्धेत गडचिरोली कराटे संघातील स्पर्धकांनी सहभाग घेत १९ सुवर्ण पदक, ९ रजत पदक व ७ कास्य पदक अशा तब्बल ३५ पदकांची कमाई करीत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्पर्धेसाठी नामांकन : १९ सुवर्ण, ९ रजत व ७ कांस्यपदकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र कराटे अससोसिएशन संलग्नित महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन व आॅल इंडिया कराटे डो फेडेरेशन तर्फे ४० वी महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा नुकताच मुंबईमधील धारावी येथील क्रीडा संकुल मध्ये पार पडली. या स्पर्धेत गडचिरोली कराटे संघातील स्पर्धकांनी सहभाग घेत १९ सुवर्ण पदक, ९ रजत पदक व ७ कास्य पदक अशा तब्बल ३५ पदकांची कमाई करीत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.धारावी (मुंबई) येथे पार पडलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यातील कराटेपटूंनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धा मुले-मुली सब ज्युनियर, ज्युनियर, कॅडेट, सिनियर वयोगटात पार पडली. यात गडचिरोली कराटे संघाने सहभाग घेऊन गेल्या तीन वर्र्षापासूनच पदक पटकाविण्याची परंपरा कायम राखित इतिहास रचला. यात अनुष्का बिटकर एक सुवर्ण व एक रजत पदक, ऐनम गायगोले एक सुवर्ण व एक रजत, आर्या बिडकर एक रजत, गौरी सालोटकर दोन सुवर्ण पदक, आकांक्षा बन्सोड एक सुवर्ण व एक कास्य पदक, संस्कृती अरसोडे दोन कास्य पदक, अनंतसाई नेदनूरवर दोन कांस्य, सार्थक गेडाम एक सुवर्ण व एक कांस्य पदक, संदेश कुकुडकर एक सुवर्ण व एक रजत पदक, यश नेदनूरवर दोन सुवर्ण, मिलिंदकुमार गेडाम दोन सुवर्ण, सचिन उईके एक सुवर्ण, टीम काता मुलींमध्ये तीन सुवर्ण, टीम काता मुलांमध्ये तीन रजत, टीम कुमीते पाच सुवर्ण पदक, निखिल कांबळे एक रजत, शुभम येनगंटीवार एक रजत असे एकूण ३५ पदकांची कमाई करीत जिल्ह्याचे नावलौकिक केले. तसेच एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपले नाव निश्चित केले आहे.गडचिरोली जिल्हा क्रीडा कराटे डो अससोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रुपराज वाकोडे, सचिव योगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सुयश प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांनी यशाचे श्रेय सेन्साई योगेश चव्हाण, महेंद्र वठी, सोनाली चव्हाण, शिला शिंदे आदींना दिले.