शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका

By admin | Updated: May 20, 2014 23:37 IST

स्थानिक उपजिल्हा रूग्णालयाला राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून याचा लाभ कुरखेडा व

कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयाला राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून याचा लाभ कुरखेडा व कोरची तालुक्यातील रूग्णांना मिळणार आहे. जिल्ह्याच्या उत्तर दिशेला असलेले कोरची व कुरखेडा हे दोन्ही तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यांच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावे लागते. बर्‍याचदा या रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात किंवा नागपूर येथे हलवावे लागते. या दोनही ठिकाणांचे कुरखेडापासूनचे अंतर १०० किमी पेक्षा जास्त आहे. कुरखेडा रूग्णालयात अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका नसल्याने रूग्णाला व त्याच्या नातेवाईकांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत होता. बर्‍याचदा रूग्णाचा वाटेतच मृत्यूही होत होता. त्यामुळे रूग्णालयाला अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी कुरखेडा रूग्णालय प्रशासनातर्फे राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडे करण्यात आली होती. त्यानुसार कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाला अत्याधुनिक सुविधा असलेली रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेमध्ये ३ डॉक्टर राहणार आहे. यामध्ये एक महिला डॉक्टरचा समावेश आहे. गंभीररित्या जखमी असलेल्या किंवा स्वत: चालु शकत नसलेल्या रूग्णाला रूग्णवाहिकेत चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी स्ट्रेचर, व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर जीवनरक्षक प्रणाली, रक्तमापक यंत्र आदी सुविधा उपलब्ध आहेत. यापूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र या रूग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा नसल्याने रूग्णाला दुसर्‍या ठिकाणी हलविते वेळी आवश्यक औषधोपचार होत नव्हता. त्यामुळे बर्‍याच रूग्णांचा रूग्णवाहिकेतच मृत्यू होत होता. पाच वर्षापूर्वी पुरविण्यात आलेल्या रूग्णवाहिका भंगार झाल्या आहेत. मात्र दुसरी रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जुन्याच रूग्णावाहिकांवर रूग्णांना ने-आण केली जात होती. हिच परिस्थिती जिल्ह्याच्या इतरही रूग्णालयांमध्ये दिसून येते. कुरखेडा रूग्णालयाला रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने रूग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळतील, अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र या रूग्णवाहिकेची योग्य निगा राखणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा इतर रूग्णवाहिकांप्रमाणे ही रूग्णवाहिकासुद्धा भंगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाने जिल्ह्यातील रूग्णालयांना आजपर्यंत कोट्यवधी रूपयाची आधुनिक यंत्रसामुग्री पुरविली आहे. मात्र रूग्णालय प्रशासनाने या यंत्रसामुग्रीची योग्य काळजी घेतली नसल्याने त्या बंद असल्याचे दिसून येते. हिच स्थिती रूग्णवाहिकेवर होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)