शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराच्या ओझ्यातून मुक्तीसाठी उपाययोजना सुरू

By admin | Updated: December 31, 2015 01:34 IST

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत विद्यमान राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.

गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांना दिली जबाबदारी : खासगी इंग्रजी शाळांमध्ये दप्तराचे वजन शिक्षण विभागाने तपासलेगडचिरोली : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत विद्यमान राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात काही प्रमाणात सुरू झाली आहे.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची बैठक आयोजित करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत विचार विनिमय करून त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनही केले. खासगी इंग्रजी शाळांमधील बरेचसे विद्यार्थी फॅन्सी दिसणाऱ्या बॅग वापरतात. त्याचे वजन मोठे असल्याने यावर नियंत्रण आणावे व विद्यार्थ्यांना समान स्वरूपाच्या बॅग उपलब्ध करून दिल्यास ही अडचण दूर होईल, असा विश्वास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. पाठीवर मोठे दफ्तर, खांद्याला पाण्याची बॉटली, दुसऱ्या खांद्यावर जेवणाचा डबा असलेली बॉस्केट, तर काही ठिकाणी खेळण्याचे सामान दिसून येते. यामुळे मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मान दुखणे, मणक्याची झिज होणे, थकवा, मानसिक ताण अशा व्याधींना सामोरे जावे लागते. या परिस्थितीचा विचार करून सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसून येत नव्हती. जिल्हा परिषद शाळांमध्येही अंमलबजावणीचा अभावच आहे. अनेक ठिकाणी मुले हातात पॉलिथीनमध्ये सुटे पुस्तक घेऊन येताना लोकमतच्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. गडचिरोली शहरात प्लॉटिनम ज्युबली शाळेने दप्तर ओझे कमी करण्यासंदर्भात पालकांना आवाहन करणारे एक पत्र जारी केले होते. शिक्षण विभागाने अंमलबजावणीवर जेमतेम उपाययोजना सुरू केली आहे. त्याचे स्वरूप व्यापक नसल्याने या उपक्रमाला पालकांचाही फारसा प्रतिसाद अद्याप जिल्ह्यात मिळालेला नाही. त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दप्तराचे ओझे अद्यापही कायम असल्याचेच दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)(सहभाग- मुकेश जांभुळकर, प्रशांत ठेपाले, महेंद्र रामटेके)