शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करा

By admin | Updated: May 23, 2014 23:50 IST

अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील संपूर्ण धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी अहेरीचे आमदार दीपक आत्राम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव

गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील संपूर्ण धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी अहेरीचे आमदार दीपक आत्राम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडे शुक्रवारी मुंबई येथे केली आहे. नामदार पिचड यांची आमदार दीपक आत्राम यांनी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तीन नद्या बारमाही वाहणार्‍या आहेत. त्यामुळे या तालुक्यात वर्षातून दोन वेळा शेतकरी धानाचे पीक घेतात. परंतु आदिवासी विकास महामंडळामार्फत संपूर्ण तालुक्यात धान खरेदी वर्षातून एकदाच करण्यात येते. दुसर्‍यांदा शेतकर्‍यांनी घेतलेल्या धान पिकाची खरेदी आदिवासी विकास महामंडळ करत नाही. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना आपले धान पीक व्यापार्‍यांना अत्यल्प किमतीत विकावे लागते व शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो. अनेक शेतकरी आपला माल आंध्रप्रदेश राज्यात विक्रीसाठी नेतात. यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंडही पडतो. आंध्रप्रदेशात पडेल भावाने मालाची विक्री करावी लागते. एक ते दोन दिवस यासाठी मोडतात. सिरोंचा तालुक्यातील शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात घेऊन या तालुक्यात तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार दीपक आत्राम यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्याकडे केली. त्यानंतर नामदार पिचड यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत तत्काळ आदिवासी विकास महामंडळाची बैठक बोलावून या संदर्भात निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिरोंचा तालुक्याकरिता खरेदी केंद्र सुरू होईल, अशी माहिती आमदार दीपक आत्राम यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)