शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

५३ गावात धान्य पोहोचविण्यास प्रारंभ

By admin | Updated: June 2, 2017 01:03 IST

तालुक्यातील दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात दोन ते तीन महिने गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असतो.

भामरागड तालुका : पावसाळा सुरू होण्यापूर्वी महसूल विभागाचे नियोजनलोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात दोन ते तीन महिने गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असतो. अशा स्थितीत धान्य वितरण करताना अडचणी येऊ नयेत. याकरिता भामरागड येथे दरवर्षीच चार महिन्याचे धान्य सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पावसाळ्यापूर्वी पोहोचविले जाते. यंदा ५३ गावांसाठी चार महिन्यांचे धान्य भामरागड येथून दुर्गम गावांत पोहोचविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. भामरागड येथे धान्य पोहोचविल्यानंतर तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये धान्य पोहोचविले जाते. ३१ मे रोजी तालुक्यातील बिनागुंडा येथे नवसंजीवन योजनेंतर्गत धान्य पोहोचविण्यात आले. तालुक्यातील अतिदुर्गम गावांमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी धान्य दरवर्षीच पोहोचविले जाते. यावर्षी भामरागड तालुक्यातील २२ पावसाळी केंद्रांतर्गत येणाऱ्या ५३ गावांसाठी चार महिन्यांचे धान्य पोहोचविण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तालुक्यातील गावांमध्ये धान्य पुरवठा करण्यासंदर्भात काम सुरू आहे. तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या समक्ष तहसीलदार कैैलास परमेश्वर अंडिल यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक ए. टी. भंडरवाड धान्याचे वितरण करीत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात तीन ते चार महिने दुर्गम गावातील तालुका मुख्यालयाचा संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे या गावांमध्ये धान्य पोहोचविणे शक्य होत नाही. या भागातील नागरिक पावसाळ्यापूर्वी आवश्यक सामग्रीही स्वत: नेतात. त्यामुळे त्यांनाही पावसाळ्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. यंदा नागरिकांची लगबग सुरू झालेली आहे.