२० आणि २१ ला मोर्चे : सूरजागड बचाव समिती व आविसचा पुढाकारएटापल्ली : प्रस्तावित लोहखनिज प्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभा करण्यात यावा, प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्ट होईपर्यंत लोहखनिजाची वाहतूक बंद करण्यात यावी आदी मागण्यांसह अन्य मागण्यांना घेऊन सुरजागड बचाव संघर्ष समिती एटापल्ली व आदिवासी विद्यार्थी संघ एटापल्लीच्या वतीने २० व २१ एप्रिल रोजी एसडीओ कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. २० एप्रिल रोजी सुरजागड बचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित मोर्चाचे नेतृत्व विधानसभेचे काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार पेंटारामा तलांडी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सगुना तलांडी, सामाजिक कार्यकर्ते अॅड. लालसू नरोटे आदी करणार आहेत. या मोर्चाला सर्व पक्षीय नेते उपस्थित राहतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. तर २१ एप्रिल रोजी आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षीत बेरोजगारांचा मोर्चा माजी आमदार दीपक आत्राम, जि.प.चे सभापती अजय कंकडालवार, जि.प. सदस्य कारू रापंजी, गीता हिचामी, आविसचे तालुकाध्यक्ष नंदू मट्टामी, माजी पं. स. सदस्य मंगेश हलामी यांच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयावर नेला जाणार आहे, अशी माहिती आविसतर्फे देण्यात आली आहे.
सूरजागड प्रकल्पावरून मोर्चायुध्दाला सुरूवात
By admin | Updated: April 20, 2016 01:43 IST